भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यादरम्यान अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर चार कसोटी सामन्यांच्या मालिकेतील अखेरचा सामना तिसऱ्या दिवशीच संपला. भारतीय संघाने एक डाव आणि २५ धावांनी विजय मिळवत ३-१ अशा फरकाने मालिका आपल्या नावे केली. या सामन्यात यष्टीरक्षक रिषभ पंतने आपल्या कारकीर्दीतील तिसरे कसोटी शतक पूर्ण केले. त्याचवेळी रिषभ पंत व भारताचा माजी वेगवान गोलंदाज आशिष नेहरा यांचे एक जुने छायाचित्र चांगलेच व्हायरल होत आहे.
व्हायरल होत आहे ते छायाचित्र
इंग्लंड विरुद्धच्या चौथ्या कसोटीत शतक झळकावल्यानंतर रिषभ पंत व भारताचा माजी वेगवान गोलंदाज आशिष नेहरा यांचे एक दुर्मिळ छायाचित्र सध्या सोशलमीडियावर चांगलेच फिरत आहे. या छायाचित्रामध्ये नेहरा छोट्या रिषभच्या बॅटवर ऑटोग्राफ देताना दिसतोय. एका स्थानिक क्रिकेट अकादमीच्या उद्घाटनप्रसंगीचे हे छायाचित्र असल्याचे बोलले जात आहे. नेहरा धोनीचा उत्तराधिकारी म्हणून कायम पंतचे नाव घेत असतो.
https://twitter.com/shehzad25362849/status/1368051064180707333
आकाश चोप्राने केले मजेदार ट्विट
रिषभ पंत व आशिष नेहरा यांच्या या छायाचित्रावर भारताचा माजी सलामीवीर व सध्या समालोचक म्हणून काम करणाऱ्या आकाश चोप्राने ट्विट केले आहे. या ट्विटमध्ये त्याने लिहिले, ‘असेच एक छायाचित्र आपण युवा विराट कोहली व आशिष नेहरा यांचे पाहिले होते. तुम्ही समजू शकता की या यशाची ‘सिक्रेट रेसिपी’ काय आहे.’
काही वर्षांपूर्वी भारताचा विद्यमान कर्णधार विराट कोहली व आशिष नेहरा यांचे जुने छायाचित्र प्रसिद्ध झाले होते. त्यामध्ये नेहरा विराटला एका स्थानिक सामन्यात सामनावीर पुरस्कार देताना दिसत होता.
We saw a similar picture of young Kohli too. So…..you know the secret recipe now 🥳🤩 https://t.co/U1z5o7iLoB
— Aakash Chopra (@cricketaakash) March 5, 2021
जवळपास १७ डावानंतर रिषभने ठोकले शतक
रिषभ पंतने १७ कसोटी डावानंतर शतक ठोकले. रिषभने आपले अखेरचे कसोटी शतक २०१९ मध्ये ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर ठोकले होते. त्यावेळी त्याने १५९ धावांची खेळी केलेली. दुसऱ्या आणि तिसऱ्या शतकादरम्यान रिषभ दोन वेळा ‘नर्वस नाईन्टीज’ चा शिकार झाला होता. या वर्षीच्या सुरुवातीला सिडनी कसोटीत ९७ तर याच मालिकेत चेन्नई कसोटीत ९१ धावांवर त्याची खेळी संपुष्टात आली होती.
महत्त्वाच्या बातम्या –
कसोटी चॅम्पियनशीप: भारताचं फायनलचं तिकीट पक्क! लॉर्ड्सवर न्यूझीलंडविरुद्ध करणार दोन हात
Video: कॅचमास्टर अजिंक्य! अवघ्या काही इंचांनी चेंडू मैदानाला लागू न देता पकडला भन्नाट झेल
अश्विन नंबर वन! ‘असा’ पराक्रम करणारा ठरला पहिलाच भारतीय क्रिकेटर