भारत विरूद्ध ऑस्ट्रेलिया (India vs Australia) संघात 5 सामन्यांची बाॅर्डर-गावसकर मालिका खेळली जाणार आहे. तत्पूर्वी रिषभ पंतच्या (Rishabh Pant) हँगओव्हरचा ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघाला इतका फटका बसला आहे की, बॉर्डर-गावसकर ट्रॉफीपूर्वी (Border Gavaskar Trophy) ऑस्ट्रेलियन मीडियामध्ये पंतचे नाव चर्चेत आले आहे. टी20 वनडे किंवा कसोटी, भारताचा हा यष्टीरक्षक फलंदाज त्याच्या धडाकेबाज फलंदाजीच्या शैलीसाठी ओळखला जातो. शेवटी काय कारण आहे की ऑस्ट्रेलियन संघाला पंतच्या नावाची भीती वाटत आहे.
2021 मध्ये गाबा मैदानावर रिषभ पंतने (Rishabh Pant) भारतीय संघाला विजय मिळवून दिला होता. तो डाव ऑस्ट्रेलिया संघ कदाचित अनेक दशके विसरू शकणार नाही. खरे तर, 2020-2021 दरम्यान झालेल्या बॉर्डर-गावसकर ट्रॉफीच्या 3 सामन्यांनंतर भारत-ऑस्ट्रेलिया प्रत्येकी एक अशा बरोबरीत होते. शेवटचा सामना गाबा मैदानावर खेळला गेला, जिथे भारताला चौथ्या डावात 328 धावांचे लक्ष्य मिळाले.
त्या सामन्यात पंत आणि पुजारामध्ये 61 धावांची भागीदारी पाहून भारत हा सामना अनिर्णित ठेवण्यात यशस्वी होईल असे वाटत होते. पण त्यानंतर पुजारा बाद झाला. पुजाराची विकेट पडल्यानंतर भारत बचावात्मक खेळेल, असा विचार ऑस्ट्रेलिया करत असेल. मात्र बचावात्मक रणनीती अवलंबण्याऐवजी पंतने अतिशय आक्रमक पद्धतीने ऑस्ट्रेलियन गोलंदाजांचा पराभव केला. पंतने 89 धावांची धमाकेदार नाबाद खेळी केली. या विजयासहित भारताने गाबाच्या मैदानावर ऐतिहासिक कामगिरी केली.
बाॅर्डर-गावसकर मालिकेतील रिषभ पंतच्या (Rishabh Pant) आकडेवारीबद्दल बोलायचे झाले, तर आकडेवारीनुसार पंतने ऑस्ट्रेलियन गोलंदाजांवर वर्चस्व गाजवले आहे. बॉर्डर-गावसकर ट्रॉफीच्या (Border Gavaskar Trophy) इतिहासात आतापर्यंत पंतने 7 सामन्यांच्या 12 डावांत 624 धावा केल्या आहेत. ‘पंत’ हे नाव ऑस्ट्रेलिया संघासाठी चिंतेचा विषय बनले आहे, कारण बॉर्डर-गावसकर ट्रॉफीमध्ये त्याची सरासरी 62.40 आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
रोहितच्या जागी ‘हा’ खेळाडू देणार संघासाठी सलामी, गौतम गंभीरनं स्पष्टच सांगितलं
मराठमोळा आयुष आयपीएलमध्ये खेळणार! सीएसकेने ट्रायलसाठी बोलावले
“गौतम गंभीरची बोलण्याची पद्धत योग्य नाही, त्याला मीडियापासून दूर ठेवा”, संजय मांजरेकरांचा बीसीसीआयला सल्ला