आयपीएलप्रमाणेच लोकप्रिय होत असलेल्या प्रो कबड्डीच्या सहाव्या मोसमासाठी रिशांक देवाडीगाला युपी योद्धा या संघाचे नेतृत्व सोपवण्यात आले आहे. तो यावर्षी यूपी योद्धाचे सलग दुसऱ्यांदा प्रतिनिधित्व करणार आहे.
रिशांक हा यूपी योद्धाचा लेफ्ट रेडर आहे. महाराष्ट्राचा असणाऱ्या रिशांकला यावर्षी यूपी योद्धाने प्रो कबड्डीच्या लिलावात संघात कायम केले आहे. त्याने त्याच्या कामगिरीने सर्वांनाच प्रभावित केले आहे. त्याने मागील मोसमात 21 सामन्यात 165 रेड पॉइंट्स मिळवले आहेत.
या मोसमात त्याने जयपूर पिंक पँथर्स संघाविरुद्ध 28 रेड पॉइंट्स मिळवले होते. हे रेडरने मिळवलेले सर्वाधिक रेड पॉइंट्स होते, पण नंतर त्याचा हा विक्रम याच मोसमात पहिल्यांदा रोहित कुमारने यूपी योद्धा विरुद्ध 32 रेड पॉइंट्स मिळवत मोडला आणि नंतर प्ररदीप नरवालने हरियाना स्टीलर्स विरुद्ध 34 रेड पॉइंट्स मिळवत हा विक्रम आपल्या नावे केला.
रिशांकने प्रो कबड्डीमध्ये आत्तापर्यंत 80 सामन्यात 490 पॉइंट्स मिळवले आहेत. तो मागील वर्षापासून यूपी योद्धाकडून खेळत आहे. त्याआधी तो यू मुम्बाकडून खेळला आहे.
रिशांक हा प्रो कबड्डीमधील संघाचे नेतृत्व करणारा दुसरा महाराष्ट्रीयन खेळाडू आहे. त्याच्या आधी निलेश शिंदेने बंगाल वॉरियर्सचे दुसऱ्या, तिसऱ्या आणि चौथ्या मोसमात नेतृत्व केले आहे.
यूपी योद्धाने मागीलवर्षी प्रो कबड्डीत पदार्पण करताना बाद फेरीतही मजल मारली होती. तसेच मागील वर्षी रिशांकने तमिळ थलाइवाज विरुद्ध 8 आॅक्टोबर 2017ला झालेल्या सामन्यात यूपी योद्धाचे नेतृत्व केले होते.
महत्त्वाच्या बातम्या-
–एशिया कपमधील खराब कामगिरीचा मला बळीचा बकरा बनवले गेले
–कोरिया ओपनच्या उपउपांत्यपुर्व सायनाचा धडाक्यात प्रवेश
–विंडिज विरुद्ध कसोटी मालिकेसाठी या खेळाडूंना मिळू शकते टीम इंडियात संधी