कोरोना व्हायरसने संपूर्ण जगभरात हाहाकार माजवला आहे. त्यामुळे जवळपास सर्वच गोष्टीं थांबविण्यात आल्या आहेत. मागील एक महिन्यापेक्षा अधिक काळापासून कोणत्याच खेळाचे आयोजन झालेले नाही. कोणालाही पार्टीच नव्हे तर घरातून बाहेरही जाता येत नाही.
अशामध्ये भारतीय संघाचा मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा (Sachin Tendulkar) वाढदिवस काही दिवसांपुर्वी झाला. पण त्याने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आपला वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय घेतला होता.
यानंतर भारतीय वनडे संघाचा उपकर्णधार रोहित शर्माचा (Rohit Sharma) काल (३० एप्रिल) वाढदिवस होता. या दरम्यान त्याला फिरकीपटू गोलंदाज युजवेंद्र चहलने (Yuzvendra Chahal) अनोख्या अंदाजात शुभेच्छा दिल्या होत्या. तरी यावर रोहितची पत्नी रितिकाने नाराजी व्यक्त केली आहे.
खरंतर, रोहितच्या वाढदिवसाच्या दिवशी चहलने आयपीएलचा एक फोटो शेअर करत त्याला शुभेच्छा दिल्या. त्याने आपल्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवरून हा फोटो शेअर करत लिहिले की, “मला तुझ्या वाढदिवसा दिवशी सर्वांना हे सांगण्याची संधी मिळाली की, तुझ्या हसण्यामागील नेमकं गुपीत काय आहे. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा रोहित”
https://www.instagram.com/p/B_k-AJBBOBT/?utm_source=ig_web_copy_link
चहलचे हे वक्तव्य रोहितच्या पत्नीला आवडले नाही. तिने चहलच्या या पोस्टवर कमेंट केली की, “माझ्या मते तू विसरला आहेस की गुपीत एक आहे की दोन.” कदाचित रितिकाचा (Ritika) इशारा हा स्वत: आणि आपल्या मुलीकडे होता. ती सांगण्याचा प्रयत्न करत होती की, रोहितच्या हसण्यामागील गुपीत हे ती स्वत: आणि मुलगी समायराही आहे.
चहलला नेहमीच सोशल मीडियावर सक्रिय असलेले पहायला मिळते. तो आपल्या संघसहकाऱ्यांची थट्टा करतो. तसेच रोहित आणि विराट कोहलीनेदेखील (Virat Kohli) त्याची अनेकवेळा थट्टा केली आहे.
ट्रेंडिंग घडामोडी-
-आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारे ५ महाराष्ट्रीयन खेळाडू
-दक्षिण आफ्रिका क्रिकेट बोर्डाची एबीला थेट कर्णधारपदाची ऑफर?? एबी म्हणतो…
-आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारे ५ महाराष्ट्रीयन खेळाडू






