आयसीसी टी-२० विश्वचषक २०२१ स्पर्धेत भारतीय संघाला साजेशी कामगिरी करण्यात अपयश आले आहे. या स्पर्धेतील पाहिल्या सामन्यात भारतीय संघाला पाकिस्तान संघाने १० गडी राखून पराभूत केले होते. त्यानंतर दुसऱ्या सामन्यात देखील भारतीय संघाला न्यूझीलंड संघाकडून ८ गडी राखून पराभवाचा सामना करावा लागला आहे. या सामन्यातील पहिल्याच चेंडूवर रोहित शर्माला जीवनदान मिळाले होते. त्यानंतर त्याची पत्नी रितिका सजदेहने दिलेली रिॲक्शन सध्या सोशल मीडियर चर्चेचा विषय ठरतेय.
पाकिस्तान संघाविरुद्ध झालेल्या पराभवानंतर भारतीय संघात अनेक मोठे बदल करण्यात आले होते. सूर्यकुमार यादवच्या जागी संधी दिलेल्या ईशान किशनला डावाची सुरुवात करण्याची संधी देण्यात आली होती. परंतु तो मोठी खेळी करू शकला नाही आणि स्वस्तात माघारी परतला. त्याला अवघ्या ४ धावा करता आल्या.
त्यानंतर तिसऱ्या षटकात रोहित शर्मा फलंदाजी करण्यासाठी मैदानावर आला होता. त्यावेळी पहिल्याच चेंडूवर रोहित शर्माने मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला. परंतु हा प्रयत्न फसला आणि चेंडू सीमारेषेच्या दिशेने क्षेत्ररक्षण करत असलेल्या टीम शिफर्टच्या हातात गेला. परंतु रोहित शर्माला नशीबाची साथ मिळाली आणि टीम शिफर्टच्या हातून तो झेल निसटला.
ज्यावेळी चेंडू हवेत गेला त्यावेळी रोहित शर्माची पत्नी रितिका सजदेहची रिॲक्शन पाहण्यासारखी होती. तिच्या चेहऱ्यावर भीती आणि चिंता झळकत होती. त्यानंतर जेव्हा टीम शिफर्टच्या हातून झेल निसटला त्यावेळी तिच्या जीवात जीव आला. रितिका सजदेहच्या रिॲक्शनचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
This man saved #RohithSharma #ind vs #NZvsIND pic.twitter.com/oN6Gv09FUL
— 𐌍𐌀Ᏽ𐌀𐌓𐌀Ꮭ𐌵 (@nagaraju_polasa) October 31, 2021
जीवनदान मिळाल्यानंतर देखील रोहित शर्माला मोठी खेळी करता आली नाही. तो अवघ्या १४ धावा करत पॅव्हेलियनमध्ये परतला. भारतीय संघाला या सामन्यात २० षटक अखेर ११० धावा करण्यात यश आले होते. या धावांचा पाठलाग करताना न्यूझीलंड संघाने ८ गडी राखून विजय मिळवला.
महत्त्वाच्या बातम्या-
श्रीलंकन टायगर्स थांबवणार का इंग्लंडचा विजयरथ? आज दोन्ही संघांमध्ये रंगणार अटीतटीची लढत
न्यूझीलंडविरुद्धच्या पराभवानंतर बुमराह झाला व्यक्त; म्हणाला, ‘६ महिने सतत क्रिकेट, आम्हालाही…’
एकच, पण सॉलिड मारला! रोहितच्या गगनचुंबी षटकाराला पाहून खुलली चाहतीची कळी, वाजवल्या टाळ्या