---Advertisement---

‘मराठमोळा’ ऋतुराज पुनरागमनासाठी सज्ज, कोरोनावर केली मात; पण तिसऱ्या वनडेत मिळणार का संधी?

ruturaj-gaekwad
---Advertisement---

भारत आणि वेस्ट इंडीज (ind vs wi odi series) यांच्यातील तिसरा आणि शेवटचा एकदिवसीय सामना शुक्रवारी (११ फेब्रुवारी) खेळला जाणार आहे. उभय संघातील एकदिवसीय मालिका अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळली जात आहे. मालिकेतील पहिल्या दोन सामन्यात भारताने विजय मिळवला आणि २-० अशी विजयी आघाडी घेतली आहे. आता तिसऱ्या सामन्यासाठी युवा सलामीवीर ऋतुराज गायकवाड (ruturaj gaikwad) संघात पुनरागमन करण्यासाठी तयार आहे.

यापूर्वी न्यूझीलंडविरुद्ध मायदेशात खेळल्या गेलेल्या टी-२० मालिकेत ऋतुराजला संघात निवडले गेले होते, पण प्लेइंग इलेव्हनमध्ये मात्र संधी दिली गेली नाही. तसेच काही दिवसांपूर्वी पार पडलेल्या दक्षिण अफ्रिका दौऱ्यातही त्याला निवडले गेले होते. दक्षिण अफ्रिकेविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेतही त्याला खेळण्याची संधी मिळाली नाही. अशात वेस्ट इंडीजविरुद्ध एकदिवसीय मालिकेसाठी त्याला पुन्हा संधी मिळाली, पण मालिका सुरू होण्याचा चार दिवस आधी त्याला कोरोनाची लागण झाली होती.

आता त्याने कोरोनावर मात केली असली आणि विलगीकरणाचा कालावधी जरी पूर्ण केला असला, तरी वेस्ट इंडीजविरुद्ध त्याला संधी मिळण्याची शक्यता कुठेच दिसत नाहीय. कारण अनुभवी सलामीवीर शिखर धवनने देखील संघात पुनरागमन केले आहे. धवनने कोरोनावर मात केल्यानंतर कर्णधार रोहित शर्माने त्याला तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात संधी मिळणार असल्याचे स्पष्ट केले आहे. रोहितने सांगितल्याप्रमाणे धवन वेस्ट इंडीजविरुद्ध शुक्रवारी (११ फेब्रुवारी) सुरू होणाऱ्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारताच्या डावाची सुरुवात करणार आहे. अशात ऋतुराजला या सामन्यात संधी मिळताना दिसत नाहीय.

एकदिवसीय मालिका सुरू होण्यापूर्वी २ फेब्रुवारीला भारतीय संघातील शिखर धवन, ऋतुराज गायकवाड आणि श्रेयस अय्यर या महत्वाच्या खेळाडूंना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले होते. आता या खेळाडूंनी विलगीकरणाचा कालावधी पूर्ण केला आणि कोरोनावर मात देखील केले आहे.

एकदिवसीय मालिकेनंतर भारत आणि वेस्ट इंडीजमध्ये टी-२० मालिका खेळली जाणार आहे. टी-२० मालिकेत मात्र ऋतुराजला संघात निवडले गेले नाहीय. अशात पूर्ण शक्यता आहे की, तो आगामी रणजी ट्रॉफीमधून मैदानात पुनरागमन करेल. देशांतर्गत क्रिकेटमध्ये ऋतुराज महाराष्ट्र संघासाठी खेळतो.

महत्वाच्या बातम्या –

वनडे मालिका खिशात घातल्यानंतर टीम इंडिया करणार प्रयोग, धवनच्या पुनरागमनाचीही शक्यता

भारतात जन्मलो असतो, तर कधीही राष्ट्रीय संघाकडून खेळू शकलो नसतो; असे का म्हणाला डिविलियर्स?

“साहा, तू बेस्टच आहेस, पण संघातील राजकारणाला बळी पडलास”, माजी क्रिकेटरची आगपाखड

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---