भारतीय संघाचा विस्फोटक फलंदाज रॉबिन उथप्पाने सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. तो आता भारतीय संघात नसला, तरी देखील त्याने 2007 टी20 विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघाला विजय मिळवून देण्यात मोलाचे योगदान दिले होते. साखळी फेरीत पाकिस्तान संघाविरुद्ध झालेल्या सामन्यात भारतीय संघाने पाकिस्तान संघाला बॉल आऊटमध्ये पराभूत केले होते. त्यावेळी रॉबिन उथप्पाने देखील गोलंदाजी केली होती. तसेच गेल्या काही दिवसांपूर्वी त्याने चेन्नई सुपर किंग्स संघाला आयपीएल 2021 स्पर्धेचे जेतेपद देखील मिळवून देण्यात मोलाचे योगदन दिले होते.
रॉबिन उथप्पाने 2006 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते.त्याने पदार्पणाच्या पहिल्या सामन्यात डावाची सुरुवात करताना 86 धावांची तुफानी खेळी केली होती. या खेळीच्या जोरावर भारतीय संघाला विजय मिळवण्यात यश आले होते. त्याने भारतीय संघासाठी 43 सामने खेळले होते. ज्यामध्ये त्याने 6 अर्धशतकांच्या साहाय्याने 934 धावा केल्या होत्या. यासह 13 टी20 आंतरराष्ट्रीय सामन्यात एक अर्धशतकाच्या साहाय्याने 249 धावा केल्या होत्या.
रॉबिन उथप्पाने आपल्या आंतरराष्ट्रीय टी20 कारकिर्दीची सुरुवात 2007 टी20 विश्वचषक स्पर्धेत केली होती. त्याने पाकिस्तान संघाविरुद्ध झालेल्या पहिल्या सामन्यात 50 धावांची खेळी केली होती. हा सामना बरोबरीत सुटला होता. तसेच 2015 मध्ये त्याने टी20 आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील अखेरचा सामना खेळला होता. त्याने आपल्या टी20 कारकिर्दीत त्याने 279 सामन्यात 7042 धावा केल्या होत्या. या दरम्यान त्याने 40 अर्धशतक झळकावले आहे.
आयपीएल स्पर्धेत मिळवले आहेत 2 जेतेपद
आयपीएल स्पर्धेच्या इतिहासात रॉबिन उथप्पाने 2 वेळेस जेतेपद पटकावले आहे. 2014 मध्ये कोलकाता नाईट रायडर्स संघासाठी खेळताना त्याने अप्रतिम कामगिरी करत जेतेपद मिळवून दिले होते. त्याने या स्पर्धेत सर्वाधिक 660 धावा केल्या होत्या. तसेच आयपीएल 2021 स्पर्धेत त्याने चेन्नई सुपर किंग्स संघाला विजय मिळवून दिला होता. त्याने अंतिम सामन्यात 15 चेंडूंमध्ये 31 धावांची खेळी केली होती.
महत्त्वाच्या बातम्या –
आयपीएस अधिकारी व्हायचे स्वप्न पाहणारा मुलगा बनला क्रिकेटपटू, वाचा संजू सॅमसनचा प्रेरणादायी प्रवास
तालिबानकडून ‘या’ माजी अष्टपैलू खेळाडूची अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाच्या अध्यक्षपदी वर्णी
दुसऱ्या उपांत्य सामन्यात नशीब आजमावणार पाकिस्तान-ऑस्ट्रेलिया? अशी असेल प्लेइंग इलेव्हन