काही दिवसांपूर्वी पार पडलेल्या आयपीएल मेगा लिलावात (ipl 2022 mega auction) अनेक खेळाडूंवर कोट्यावधी रुपयांची बोली लागली. अनुभवी यष्टीरक्षक फलंदाज रॉबिन उथप्पा (robin uthappa) याला चेन्नई सुपर किंग्सने (CSK) पुन्हा एकदा २ कोटी रुपयांमध्ये विकत घेतले आहे. असे असले तरी, उथप्पाने मेगा लिलावाविषयी मोठी प्रतिक्रिया दिली आहे. त्याच्या मते आयपीएल लिलाव नाही झाला पाहिजे. यामागचे, कारणही त्याने स्पष्ट केले आहे. त्याच्या मते मेगा लिलावात खेळाडूला किती रक्कम मिळाली आहे, यावर त्याची तुलना व्हायला सुरुवात होते, जी गोष्ट योग्य नाही.
एका वृत्तवाहिनीशी बोलताना रॉबिन उथप्पा म्हणाला की, “लिलाव परीक्षेसारखा असतो. ज्यामध्ये तुम्ही खूप काळ आधीच प्रश्नपत्रिका लिहिली आहे आणि निकालाची वाट पाहत आहात. हे चांगले वाटत नाही. प्रदर्शनाच्या आधारावर मत व्यक्त करणे वेगळी गोष्ट आहे. पण जेव्हा आयपीएलमध्ये मिळणाऱ्या पैशांवर तुमची तुलना होऊ लागते, तेव्हा ही गोष्ट योग्य नाही. मी त्या खेळाडूंसोबत आहे. जे अनेक हंगामांपासून आयपीएलचा भाग होते. पण लिलावात अनसोल्ड राहिले. यामुळे कधी कधी खूप वाईट वाटते. अचानक तुमची किंमत त्या गोष्टीवर ठरते की, लिलावात तुम्हाला किती पैसे मिळाले आहेत.”
रॉबिन उथप्पा आयपीएल २०२२ मध्ये पुन्हा एकदा चेन्नई सुपर किंग्जचे प्रतिनिधित्व करताना दिसणार आहे. त्याची स्वतःची इच्छा होती की, सीएसकेने त्याला पुन्हा एकदा संघात सामील करावे. तो म्हणाला की, “मला सीएसकेसाठी खेळायचे होते. मी हीच प्रार्थना करत होतो. एवढेच नाही, तर माझ्या कुटुंबाचीही इच्छा होती की, मी चेन्नईसाठी खेळावे. मी या संघात येऊन खूप आनंदी आहे, ज्याठिकाणी तुम्हाला पूर्ण सुरक्षा मिळते आणि सन्मान मिळतो. ईथे खेळाडूंना खूप सपोर्ट केला जातो आणि याच कारणास्तव मला वाटते की, मी काहीही करू शकतो” उथप्पा २०१४ मध्ये कोलकाता नाईट रायडर्ससाठी खेळत असताना सर्वाधिक धावा करणारा खेळाडू बनला होता.
महत्वाच्या बातम्या –
रोहित किती क्रिकेट खेळणार? संघातील वरिष्ठ खेळाडूनेच विचारला सवाल
युवा ऋचा घोषचा न्यूझीलंडविरुद्ध झंझावात! तुफानी अर्धशतकासह मोडला १४ वर्ष जुना विक्रम
श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेपूर्वी भारतीय संघ व्यवस्थापनात मोठा बदल; ‘त्या’ व्यक्तीच्या जागी…