चेन्नई सुपर किंग्स संघ यंदाच्या १५व्या आयपीएल हंगामात खूपच संघर्ष करताना दिसत आहे. या हंगामात आतापर्यंत खेळलेल्या सुरुवातीच्या सलग ३ सामन्यात चेन्नईला पराभवाचा सामना करावा लागला आहे. या हंगामाला सुरुवात होण्यापूर्वी पार पडलेल्या आयपीएल २०२२च्या मेगा लिलावापूर्वी चेन्नईने एमएस धोनी, मोईन अली, रवींद्र जडेजा आणि ऋतुराज गायकवाड या खेळाडूंना रिटेन केले होते. त्यांच्यासमोर नवीन संघाला जुन्या संघाप्रमाणे मजबूत बनवण्याचे आव्हान होते. काही प्रमाणात त्यांनी अनुभवी आणि युवा खेळाडूंवर बोली लावत त्यांना संघात सामील केले होते.
चेन्नईने युवा खेळाडू तुषार देशपांडे, शिवम दुबे, राजवर्धन हंगारगेकर आणि केएस आसिफ यांना संघात घेतले. संघाने आपल्या जुन्या खेळाडूंवरही बोली लावली आणि आपल्या संघात त्यांना सामील केले. त्यात ड्वेन ब्रावो, रॉबिन उथप्पा, दीपक चाहर आणि अंबाती रायुडू या खेळाडूंना ताफ्यात सामील करण्यात आले होते. स्टार सलामीवीर फलंदाज रॉबिन उथप्पाने (Robin Uthappa) लिलावात चेन्नई संघाने ताफ्यात सामील केल्यानंतर एमएस धोनीसोबत (MS Dhoni) झालेल्या चर्चेबद्दल खुलासा केला आहे.
𝐑eviewing 𝐃 techniques! 💪#CSKvPBKS #WhistlePodu#Yellove 🦁 pic.twitter.com/12IvQ18iat
— Chennai Super Kings (@ChennaiIPL) April 3, 2022
अश्विनशी युट्यूब चॅनेलवर चर्चा करताना उथप्पा म्हणाला की, “एमएस धोनीने मला दोन दिवसांनंतर फोन केला आणि म्हणाला आपण भेटूया. तो म्हणाला, तुझे संघात स्वागत आहे. मी म्हणालो की, माझ्यावर विश्वास दाखवण्यासाठी धन्यवाद. यावर तो म्हणाला की, या निर्णयाशी माझे काहीही देणं-घेणं नाही. मी दोन कारणांमुळे काहीही केले नाही. एक म्हणजे, तुझं भलं व्हावं आणि तुला या संघात स्वत:च्या जोरावर स्थान मिळावे. दुसरं म्हणजे, जर मी या निर्णयात सामील असतो, तर लोक नेहमी म्हणाले असते की, तू माझा मित्र आहेस आणि त्यासाठी मी तुला संघात सामील केले आहे. माझा या निर्णयात काहीही सहभाग नाहीये.”
मुंबई इंडियन्स, रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर, कोलकाता नाईट रायडर्स आणि राजस्थान रॉयल्स संघाकडून खेळल्यानंतर उथप्पा आयपीएल २०२१मध्ये चेन्नई संघाकडून खेळताना दिसला होता. त्यावेळी त्याने ४ सामने खेळताना ११५ धावा केल्या होत्या.
पुढे बोलताना तो म्हणाला की, “म्हणून जेव्हा ते माझ्याकडे आले, तेव्हा मी सपोर्ट स्टाफ, कोचिंग स्टाफ आणि व्यवस्थापनाला विचारले. जर ते ठीक असतील, तर आपण पुढे जाऊ शकतो. मला या निर्णयाशी काही घेणं-देणं नाही. मला विश्वास दिला की, सपोर्ट स्टाफचा माझ्यावर विश्वास आहे. माझ्यासाठी हे असे होते की, ‘ठीक आहे, आता मी तिथे जाऊन माझा खेळ खेळू शकतो आणि लगेच मला संघाशी जोडले गेल्यासारखे वाटले.'”
रॉबिन उथप्पाच्या या हंगामातील कामगिरीबद्दल बोलायचं झालं, तर त्याने सुरुवातीचे ३ सामने खेळताना ३०.३३च्या सरासरीने ९१ धावा केल्या आहेत. यामध्ये एका अर्धशतकाचाही समावेश आहे.
चेन्नईचा चौथा सामना शनिवारी (दि. ०९ एप्रिल) सनरायझर्स हैदराबाद संघाविरुद्ध खेळला गेला. या सामन्यात उथप्पाला ११ चेंडूत फक्त १५ धावा करता आल्या. यामध्ये त्याने १ चौकारही ठोकला होता.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
युएईत आयपीएल गाजवलेल्या ऋतुराजला मानवेना भारतातील हवामान; आकडेवारीच देतेय साक्ष
सहनही होईना अन् सांगताही येईना! सामन्यादरम्यान गुजरातच्या खेळाडूला जोराची लागली, मग काय झालं पाहाच
‘काही दिवस असे असतात, जेव्हा मोठे शॉट्स खेळणे…’, सामनावीर ठरलेल्या शुबमन गिलचे वक्तव्य