येत्या ९ एप्रिल पासून आयपीएल स्पर्धेचे आयोजन करण्यात येणार आहे. गतवर्षी कोरोना व्हायरसच्या धोक्यामुळे आयपीएल स्पर्धेचे आयोजन उशिराने आणि युएईमध्ये करण्यात आले होते. यावर्षी आयपीएल स्पर्धा भारतातच होणार आहे. सर्व संघांनी आयपीएल स्पर्धेसाठी तयारीलाही सुरुवात देखील केली आहे. आयपीएल इतिहासातील दुसरा यशस्वी संघ चेन्नई सुपर किंग्स संघाच्या काही खेळाडूंनी तर सरावाला सुरुवात देखील केली आहे. दरम्यान या संघात १४ व्या हंगामासाठी दाखल झालेल्या खेळाडूने सलामीला फलंदाजी करण्याचा मानस असल्याचे म्हटले आहे.
आयपीएल २०२१ स्पर्धेसाठी चेन्नई सुपर किंग्स संघात रॉबिन उथप्पाला संधी देण्यात आली आहे. उथप्पाने १३ व्या हंगामात राजस्थान रॉयल्स संघाचे प्रतिनिधित्व केले आहे. त्याने १३ व्या हंगामात मधल्या फळीत आक्रमक फलंदाजाची भूमिका बजावली होती. पण त्याने येत्या आयपीएलच्या १४ व्या हंगामासाठी चेन्नई संघासाठी सलामीला फलंदाजी करण्याची इच्छा व्यक केली आहे.
त्याने दिलेल्या एका मुलाखतीत म्हटले की, “मला खरं तर सलामीसाठी फलंदाजी करायची आहे. हे ते स्थान आहे, ज्यावर मी माझा स्वाभाविक खेळ खेळू शकतो. संघाला चांगली सुरुवात करून देणे आणि संघाच्या विजयात महत्वाची भूमिका बजावणे माझ्यासाठी एक अशी गोष्ट आहे, ज्यामध्ये मी नेहमी समाधानी असतो. गेल्या काही वर्षांमध्ये मला लोकांनी त्या भूमिकेत ढकलण्याचा प्रयत्न केला आहे, ज्यामध्ये मी चांगले प्रदर्शन करू शकत नाही. यामुळेच माझे प्रदर्शन खराब झाले आहे. परंतु, जेव्हा जेव्हा मी खेळाची सुरुवात केली आहे. तेव्हा मी चांगलीच कामगिरी केली आहे.”
रॉबिन उथप्पा आयपीएलमधील कामगिरी
रॉबिन उथप्पाने आतापर्यंत आयपीएलमध्ये एकूण १८९ सामने खेळले आहेत. यात त्याने फलंदाजी करतांना २७.९ च्या सरासरीने आणि १३० च्या स्ट्राईक रेटने ४६०७ धावा केल्या आहेत. यात त्याने २४ अर्धशतक झळकावले आहेत.
महत्त्वाच्या बातम्या –
आठवणीतील सामना: कॅलिसच्या ‘त्या’ शब्दांनी जादू केली अन् आफ्रिकेने ४३५ धावांचे आव्हान सहज पार केले
“सचिनच्या ‘त्या’ सल्ल्यामुळे झालो सलामीवीर”, सौरव गांगुलीने उलगडला किस्सा
“…म्हणून ऑस्ट्रेलिया दौऱ्यातून भारतात माघारी येताच सचिनला भेटलो,” पृथ्वी शॉचा खुलासा