मागच्या काही दिवसांपासून भारतीय महिला संघाची कर्णधार हरमनप्रीत कौर सतत चर्चेत आहे. बांगलादेशविरुद्धच्या तिसऱ्या वनडे सामन्यात हरमनप्रीतकडून गैरवर्तन झाल्याचे पाहायला मिळाले होते. बांगलादेशची कर्णधार आणि मैदानी पंचांशी तिने हुज्जत घातली होती. आता बीसीसीआयचे सचिव जय शहा यांनीही याबाबत प्रतिक्रिया दिली आहे.
बांगलादेशविरुद्धचा तिसरा वनडे सामना बोरबरीत सुटला आणि मालिका देखील 1-1 अशा बरोबरीत सुटली. तिसऱ्या सामन्यात पंचांनी आपल्याला चुकीच्या पद्धतीने बाद दिले, असा हरमप्रीत कौर (Harmanpreet Kaur) हिचा समज होता. तिला सिल्पसमध्ये झेलबाद झाली होती, पण पंचांनी बाद दिल्यानंतर त्या निर्णायाशी सहमत नव्हती. अशात रागाच्या भरात भारतीय कर्णधाराने बॅट स्टंप्सवर मारली आणि पंचांशी बाद देखील घातला. सामना संपल्यानंतर हरमनप्रीतने याबाबत पंचांच्या निर्णायाबाबत नाराजीही व्यक्त केली. कर्णधार एवढ्यावर न थांबता फोटो काढण्यासाठी दोन्ही संघ एकत्र आल्यानंतर बांगलादेशची कर्णधार निगार सुलताना आणि त्यांच्या संघाला डिवचताना दिसली.
या संपूर्ण प्रकरणासाठी आयसीसीकडून हरमनप्रीतला चार डीमेरीट पॉइंट्स मिळाले आणि मर्यादित षटकांच्या दोन सामन्यासाठी बंदी घातली गेली. माध्यमांमध्ये अशा बातम्या आल्या होत्या की हरमनप्रीतच्या मुद्यावरून बीसीसीआय आयसीसीसोबत चर्चा करत आहे. मात्र बीसीसीआय सचिव जय शाह (Jay Shah) यांनी नुकत्याच दिलेल्या माहितीनुसार हरमनप्रीतवर कारवाई झाली आहे. आयसीसीकडे याबाबत मागणी करण्याची वेळही निघून गेली, असे जय शहांकडून सांगण्यात आले. बीसीसीआय अध्यक्ष रॉजर बिन्नी (Roger Binny) आणि एनसीए प्रमुख वीवीएस लक्ष्मण (VVL Laxman) हे दोघे हरमनप्रीतची चर्चा करणार असल्याचे जय शहांकडून समजले.
“आमचे (बीसीसीआय) अध्यक्ष रॉजर बिन्नी आणि वीवीएस लक्ष्मण याबाबतीत हरमनप्रीत कौरशी बोलणार आहेत. आयसीसीने आधीच हरमनप्रीतवर दोन सामन्यांसाठी बंदी घातली आहे. अशात याबाबत अपील करण्याची वेळही आता निघून गेली आहे,” अशी जय शहा नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत म्हणाले. दरम्यान, अशी माहितीही समोर येत आहे की, आगामी आशियाई गेम्ससाठी भारतीय पुरुष आणि महिला संघांना आयसीसी रँकिंगच्या आधारे थेट उपांत्यपूर्व सामना खेळण्याची संधी मिळणार आहे. असे झाले, तर हरमनप्रीत उपांत्यपूर्व आणि उपांत्य सामन्यात खेळू शकणार नाही. अंतिम सामन्यात तिला कर्णधारपदाची जबाबदारी पुन्हा मिळाले, पण त्यासाठी उपांत्यपूर्व आणि उपांत्य सामन्यात भारतीय महिला संघाला विजय मिळवणे आवश्यक आहे. (Roger Binny and VVS Laxman will talk to Harmanpreet Kaur, says Jai Shah)
महत्वाच्या बातम्या –
Asian Games 2023 । भारताला मिळणार स्पेशल ट्रीटमेंट, थेट महत्वाच्या सामन्यात खेळणार ऋतुराजच्या नेतृत्वातील संघ
टी-20चा सुपरस्टार वनडेत फ्लॉप! सॅमसनला मिळणार संधी? दोघांच्या आकडेवारीत जमीन-आस्मानाचा फरक