सर्व क्रिकेटप्रेमी आशिया चषक 2023 सुरू होण्याची आतुरतेने वाट पाहत आहेत. या स्पर्धेतील पहिला सामना पाकिस्तान आणि नेपाळ यांच्यात 30 ऑगस्ट रोजी मुलतानच्या मैदानावर होणार आहे. पहिल्यांदाच हा आशिया चषक हायब्रीड मॉडेलमध्ये आयोजित केला जात आहे. यात पीसीबी चे आयोजन अधिकार आहेत. परंतु, पाकिस्तानमध्ये फक्त 4 सामने खेळले जातील. तर उर्वरित 9 सामने श्रीलंकेत खेळवले जातील. पीसीबीने बीसीसीआयचे सचिव आणि आशियाई क्रिकेट परिषदेचे अध्यक्ष जय शाह यांना उद्घाटन समारंभात सहभागी होण्याचे आमंत्रण पाठवले होते. मात्र, त्याऐवजी आता स्पर्धेचा उद्घाटनाचा सामना पाहण्यासाठी बीसीसीआय अध्यक्ष राजा दिल्ली व उपाध्यक्ष राजीव शुक्ला हे पाकिस्तानला जाणार आहेत.
जय शहा हे आशियाई क्रिकेट परिषदेचे अध्यक्ष असल्याने त्यांना स्पर्धेच्या उद्घाटनाच्या सामन्यासाठी पीसीबीने निमंत्रण दिले होते. मात्र, त्यांनी यासाठी नकार दिल्यानंतर आता बीसीसीआयचे प्रतिनिधी म्हणून अध्यक्ष रॉजर बिन्नी व उपाध्यक्ष राजू शुक्ला आहे मुलतान येथे जाऊन अफगाणिस्तान विरुद्ध श्रीलंका हा सामना पाहतील..
2 सप्टेंबरला रंगणार भारत पाकिस्तानचा महासामना
आगामी आशिया चषक स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान हे संघ ‘अ’ गटात आहेत आणि या दोन्ही संघांमधील सामना 2 सप्टेंबर रोजी श्रीलंकेतील पल्लेकेले स्टेडियमवर होणार आहे. यानंतर भारतीय संघ 4 सप्टेंबर रोजी याच मैदानावर नेपाळ संघाविरुद्ध गटातील दुसरा आणि शेवटचा सामना खेळणार आहे. आशिया चषक स्पर्धेतील सुपर-4 सामने 6 सप्टेंबरपासून सुरू होणार असून त्यामध्ये भारत आणि पाकिस्तान 10 सप्टेंबरला पुन्हा आमनेसामने येण्याची दाट शक्यता आहे. तसेच, दोन्ही संघांनी अंतिम फेरीत प्रवेश केल्यास 17 सप्टेंबर रोजी पुन्हा त्यांची भेट होण्याची शक्यता आहे.
(Roger Binny & Rajeev Shukla will attend Afghanistan vs Sri Lanka match of Asia Cup in Pakistan)
महत्वाच्या बातम्या –
आशिया चषक 2023मध्ये संधी न मिळालेल्या भारतीय दिग्गजचा मोठा निर्णय, धरली इंग्लंडची वाट
आशिया कपवर कोरोनाचे सावट! स्पर्धा सुरू होण्याआधीच घडलं असं, लगेच वाचा