भारतीय क्रिकेट संघाचे माजी निवडकर्ता रॉजर बिन्नी यांनी म्हटले आहे की, आता वेळ आली आहे. एमएस धोनीने युवा खेळाडूंसाठी रस्ता रिकामा करायला पाहिजे. कित्येक युवा खेळाडू भारतीय संघामध्ये खेळण्यास सज्ज आहेत. धोनी आता पुर्वीप्रमाणे फिटदेखील नाही. सोबतच तो पुर्वीसारखा उत्कृष्ट खेळाडूही राहिला नाही. त्याच्या फिटनेसवर विश्वास ठेवणे व्यर्थ आहे. Roger Binny Talks About MS Dhoni Retirement And Fitness
धोनीने त्याचा शेवटचा सामना जुलै २०१९ला विश्वचषकातील उपांत्य फेरीमध्ये खेळला होता. या सामन्यात न्यूझीलंडने भारतीय संघाला पराभूत केले होते.
धोनीच्या नेतृत्त्वाखाली भारताने २००७ सालचा टी२० विश्वचषक आणि २०११ सालचा वनडे विश्वचषक जिंकला आहे. शिवाय, २०१३ सालची चॅम्पियन्स ट्रॉफीदेखील जिंकली आहे.
स्पोर्ट्सकीडाशी बोलताना बिन्नी म्हणाले की, “गेले काही हंगाम पाहिल्यास ही गोष्ट लक्षात येते की, धोनीची उत्कृष्ट क्रिकेट खेळण्याची वेळ संपली आहे. त्याने त्याच्या ताकद आणि समजतेने हारता सामना जिंकवण्याची क्षमताही गमावली आहे. सोबतच युवा खेळाडूंना प्रवृत्त (मोटिवेट) करण्याची वृत्तीही त्याच्यामध्ये आता पुर्वीसारखी राहिलेली नाही. त्याची फिटनेसही आता पुर्वीसारखी नाही. दूसऱ्या बाजूला, कित्येक युवा खेळाडू उपलब्ध आहेत. खरं सांगायचं झालं तर, धोनीची उत्कृष्ट वेळ निघून गेली आहे.”
२०१२ साली बिन्नी भारतीय संघाचे निवडकर्ता होते. त्यावेळी धोनी भारतीय संघाचा कर्णधार होता. तेव्हाच्या काही आठवणींना उजाळा देत बिन्नी म्हणाले, “धोनी जेष्ठ खेळाडूंचा खूप आदर करतो. त्यांचे म्हणणे ऐकतो. तो अतिशय विनम्र व्यक्ती आहे. तो माझ्याकडे येऊन चर्चा करत असायचा. त्याला काय करायचे आहे, ते सांगत असायचा. तो मैदानावर असायचा. आम्हाला त्याला हवा तसा संघ द्यावा लागायचा. आमच्यामध्ये कधीही कोणत्याही विषयावरुन भांडण किंवा बाचाबाती झाली नाही. त्याच्यासोबत काम करणे हा माझ्यासाठी एक चांगला अनुभव होता.”
धोनीने आतापर्यंत ९० कसोटी सामन्यात ४८७६ धावा केल्या आहेत. तर, ३५० वनडे सामन्यात १०७७३ आणि ९८ आंतरराष्ट्रीय टी२० सामन्यात १६१७ धावा केल्या आहेत. डिसेंबर २०१४ ला त्याने कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती.
तसेच आपल्या नेतृत्त्वाखाली धोनीने आयपीएलमधील चेन्नई सुपर किंग्स संघाला ३ वेळा आयपीएल ट्रॉफी जिंकून दिली आहे.
असे असले तरी, काही दिवसांपुर्वी गौतम गंभीरने स्टार स्पोर्ट्सच्या क्रिकेट कनेक्टेड शोमध्ये म्हटले होते की, “वय हा केवळ एक आकडा आहे. माझ्या मते, धोनी जर चेंडूला चांगल्याप्रकारे हीट करत असेल, तर तो चांगल्या फॉर्ममध्ये आहे आणि क्रिकेटचा आनंद लुटत आहे. जर त्याला वाटत असेल की, तो ६ किंवा ७ क्रमांकावर फलंदाजी करत भारतीय संघाला विजय मिळवुन देऊ शकतो, तर त्याने नक्की खेळायला हवे.”
महत्त्वाच्या बातम्या –
असा एक दूर्दैवी क्रिकेटपटू जो आज असता एक महान अष्टपैलू, पण तेव्हा…
अनिल कुंबळेनी ‘मंकीगेट’ प्रकरणावर केले मोठे भाष्य; म्हणाला…
वाढदिवस विशेष : आपले रक्त देऊन भारतीय कर्णधाराचा जीव वाचवणारा वेस्ट इंडिजचा दिलदार दिग्गज
ट्रेंडिंग लेख –
४ असे प्रसंग जेव्हा बांगलादेशी खेळाडू त्यांच्या कृत्यामुळे ठरले हास्यास पात्र…..
लग्न न करताच वडील होणारे हे आहेत ४ क्रिकेटपटू
या ५ गोलंदाजांनी आयपीएलच्या इतिहासात टाकले आहेत सर्वाधिक डॉट बॉल