ऑस्ट्रेलिया ओपन 2024 मध्ये भारतीय टेनिस चाहत्यांसाठी अभिमानची बातमी हाती येत आहे. दिग्गज भारतीय टेनिस खेळाडू रोहन बोपन्ना याने पुरुष दुहेरीमध्ये शनिवारी (27 जानेवारी) ग्रँड स्लॅम जिंकले. त्याने ऑस्ट्रेलियाच्या मॅथ्यू एब्डेनयाच्यासोबत पुरुष डबल्समध्ये विजेतेपद पटकावले. मेलबर्न पार्कवर खेळल्या गेलेल्या या अंतिम सामन्यात रोहन-एब्डेन जोडीने इटलीच्या सिमोन बोलेली आणि आंद्रे वावसोही यांना 7-6 (0), 7-5 ने पराभूत केले.
43 वर्षीय रोहन बोपन्ना () ग्रँड स्लॅम जिंकणारा सर्वात वयस्कर खेळाडू ठरला आहे. याआधी हा विक्रम नेदरलँड्सच्या जीन जूलियन रोजर यांच्या नावावर होता. रोजरने वयाच्या 41 व्या वर्षी मार्सेलो अरेवोला याच्यासोबत मिळून 2022 मध्ये फ्रँच ओपनचे ग्रँड स्लॅम जिंकले होते.
View this post on Instagram
दरम्यान, शनिवारी झालेल्या या पुरुष दुहेरीच्या अंतिम सामन्यात बोपन्ना-एब्डेन जोडीला कडवे आव्हान मिळाले. पहिला सेट टाय ब्रेकरपर्यंत गेला. टायब्रेकरमध्ये बोपन्ना-एब्डेनने मिळून एकही गेम गमावला नाही आणि पहिला सेट नावावर केला. दुसऱ्या सेटमध्येही रोमांच कमी झाला नाही. पण या सेटच्या 11व्या गेममध्ये इटलीच्या खेळाडूंची सर्विस ब्रेक झाली. सर्विस ब्रेकमध्ये बोपन्ना-एब्डेन जोडीच्या पारड्यात सामना झुकला. अंतिम सामना एकूण एक तास 39 मिनिटे चालला.
View this post on Instagram
रोहन बोपन्नाच्या टेनिस कारकिर्दीतील हे पुरुष दुहेरीचे पहिलेच ग्रँढ स्लॅम आहे. तर एकंदरीत कारकिर्दीतील दुसरे ग्रँड स्लॅम त्यने जिंकले आहे. याआधी 2017 मध्ये कॅनडाच्या गॅब्रियला डोब्रोवस्की हिच्यासोबत त्याने फ्रँच ओपन मिश्र दुहेरीचे विजेतेपद जिंकले होते. (Rohan Bopanna and Matt Ebden win the men’s doubles Grand Slam at the Australian Open)
महत्वाच्या बातम्या –
Australia Open । आर्यना सबालेंका पुन्हा बनली टेनिस कोर्टची राणी, दुसऱ्यांदा जिंकले ग्रँड स्लॅम
टेस्टमध्ये पहिली विकेट मिळाल्यानंतर वेस्ट इंडिजच्या खेळाडूने साजरे केले अनोखे सेलिब्रेशन, पाहा व्हिडिओ