भारतीय संघाचे आशिया चषकातील आव्हान संपुष्टात आले आहे. मंगळवारी (6 सप्टेंबर) सुपर फोर फेरीत भारताला श्रीलंकन संघाकडून पराभव स्वीकारावा लागला आणि संघ अंतिम सामन्याच्या शर्यतीतून देखील बाहेर पडला. वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमार सुपर फोरमधील दोन्ही सामन्यांध्ये भारतीय संघाला चांगलाच महागात पडला. याच पार्श्वभूमीवर भुवनेश्वरवर टीका केली जात आहे. परंतु भारताचा माजी क्रिकेटपटू रोहन गावसकर याने भुवनेश्वरवर टीका करणाऱ्यांना सुनावले आहे.
सुपर फोर फेरीत पाकिस्तान आणि श्रीलंका संघाविरुद्ध खेळताना भुवनेश्वर कुमार (Bhuvaneshwar Kumar) अपेक्षित प्रदर्शन करू शकला नव्हता. खासकरून शेवटच्या षटकांमध्ये त्याने अधिक धावा खर्च केल्या. पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात त्याने 40 धावा खर्च केल्या आणि एक विकेट घेतली होती. तर श्रीलंकाविरुद्ध 30 धावा खर्च करून एकही विकेट घेऊ शकला नाही. या दोन सामन्यांमध्ये भुवनेश्वर कुमार जरी संघासाठी महागात पडला असला, तरी त्याने यापूर्वी संघासाठी जी कामगिरी केली आहे, ती विसरता येणार नाही. भारतीय क्रिकेटपटू रोहन गावसकर (Rohan Gavaskar) यांनी देखील याविषयी प्रतिक्रिया दिली आहे.
रोहन गावसकर माध्यामांशी बोलताना म्हणाले की, “मला वाटते रोहित शर्मा आणि संघ व्यवस्थापनाने भुवनेश्वरला 19 व्या षटकात गोलंदाजी देऊन काहीच चुकीचे केले नाही. त्याचे ते षटक खूप महागात पडले, पण त्याने यापूर्वी खरोखर चांगले प्रदर्शन केले आहे. मग ते भारतीय संघासाठी असो किंवा आयपीएलमध्ये त्याच्या संघासाठी असो. त्याच्याकडे अनुभव आहे आणि सोबतच गुणवत्ता देखील आहे. मला माहिती आहे की, हे दोन्ही सामने आपण गमावले आहेत, जिथे त्याने जास्त धावा दिल्या. पण त्यामुळे त्याच्यावर प्रश्न उपस्थित करता येणार नाहीत. कारण त्याने भूतकाल खूप चांगले प्रदर्शन केले आहे.”
दरम्यान, श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात भुवनेश्वर 19 व्या षटकात गोलंदाजीसाठी आला होता. त्याच्या कोट्यातील हे शेवटचेच षटक होते. पण या 6 चेंडूत त्याने 14 धावा दिल्या आणि भारतीय संघ चांगलाच अडचणीत आला. दोन वाईड आणि चार दोन चौकारांच्या मदतीने श्रीलंकान फलंदाजांनी या धावा केल्या. परिणामी श्रीलंकन संघाने 1 चेंडू शिल्लक असतानाचा विजय मिळवला. दरम्यान, आशिया चषकाचा अंतिम सामना 11 सप्टेंबर रोजी पाकिस्तान आणि श्रीलंका यांच्यात खेळला जाणार आहे.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
ICC Team Ranking | ऑस्ट्रेलियाविरुद्धचे पराभव न्यूझीलंडाला चांगलेच पडले महागात, ‘हा’ संघ बनला नंबर वन
टी-20 विश्वचषकाच्या सराव सामन्यांचे वेळापत्रक जाहीर, ‘या’ तारखेला खेळणार भारतीय संघ
धक्कादायक! टीम इंडियाच्या सामन्यापूर्वीच स्टेडियमला लागली आग, टॉसला उशीर होण्याची शक्यता