---Advertisement---

खेळात करिअर करण्यासाठी वय अडथळा ठरु शकत नाही – रोहित शर्मा

On: शनिवार, फेब्रुवारी 15, 2020 7:53 PM
---Advertisement---

भारतीय संघाचा 33 वर्षीय सलामीवीर फलंदाज रोहित शर्माने म्हटले आहे की ‘वय हे कोणत्याही खेळात करिअर बनवण्यासाठी अडथळा ठरू शकत नाही.’ हे सांगत असताना त्याने 2 मोठी उदाहरणे देखील दिली आहेत. यात ऑस्ट्रेलियाचा दिग्गज क्रिकेटपटू मायकेल हसी(Michael Hussey) आणि पोर्तुगीज फुटबॉलपटू क्रिस्टियानो रोनाल्डो (Cristiano Ronaldo) यांचा समावेश आहे.

हसीने क्रिकेटविश्वात ‘मिस्टर क्रिकेट’ अशी ओळख निर्माण केली आहे. 2005मध्ये विंडीज विरूद्धच्या कसोटी सामन्यातून त्याने वयाच्या 30 व्या वर्षी कसोटीमध्ये पदार्पण केले होते. पुढे 6-7 वर्षे राष्ट्रीय संघात खेळल्यानंतर त्याने कसोटीतून निवृत्ती घेतली. यानंतरही बऱ्याच मार्गांनी ते क्रिकेटच्या संपर्कात आहे.

हसीचे उदाहरण देत इंडिया टुडेशी बोलताना रोहित म्हणाला की, “30 वर्षे वय असताना त्याने कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. ते 6-7 वर्षे खेळले. त्यांना ‘मिस्टर क्रिकेट’ असे संबोधले जाते. हा आपल्या सर्वांसाठी चांगला धडा आहे. यावरून कळते की, कोणताही खेळ सुरू करण्यासाठी वयाची मर्यादा नसते.” असेही तो म्हणाला.

तसेच प्रसिद्ध दिग्गज फुटबॉलपटू रोनाल्डोनेही खूप मेहनत करून आपली ओळख निर्माण केली. हसीनंतर रोनाल्डोचे उदाहरण देत रोहित म्हणाला की, “लहान वयातच रोनाल्डोने त्याच्या वडीलांना गमावले. त्याच्या आईनेच त्याला लहानाचे मोठे केले. अशा सर्व प्रसंगानंतर खेळाचा भाग होणे सोपे नसते. पण, आता पहा तो कुठे आहे. म्हणून, आपण स्वतःवर विश्वास ठेवला पाहिजे, ” असेही तो पुढे म्हणाला.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---