---Advertisement---

रोहित विराटचा ‘मुंबई लोकल’ मिम तुफान व्हायरल, चाहत्यांची मिळतेय पसंती

On: शनिवार, फेब्रुवारी 6, 2021 6:15 PM
---Advertisement---

भारत विरुद्ध इंग्लंड संघात ४ सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना शुक्रवारपासून (५ फेब्रुवारी) सुरु झाला आहे. एमए चिदंबरम स्टेडियमवर सुरु असलेल्या या सामन्याचा आज (६ फेब्रुवारी) दुसरा दिवस आहे. दुसऱ्या दिवशी इंग्लंडचा कर्णधार जो रुट द्विशतकी खेळी केली. पहिल्या दिवसापासून चिवट फलंदाजी करत रूटने भारतीय गोलंदाजांना पुरते निराश केले. त्यामुळे, सोशल मीडियावर मिम्सद्वारे भारतीय खेळाडूंची मजा घेतली जात आहे.

मिम्स होतायेत व्हायरल

भारत आणि इंग्लंड यांच्यातील कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवशी रोहित शर्मा व कर्णधार विराट कोहली यांचे एक छायाचित्र चांगलेच व्हायरल झाले होते. अनेकांनी त्यावर काही मिम्स बनवली होती. मात्र, रूटने दुसऱ्या दिवशीही आपली मॅरेथॉन खेळी सुरू ठेवल्याने त्याच छायाचित्राचा आधार घेऊन आणखीन नवी मिम्स व्हायरल झाली.

मुंबई लोकलने प्रवास करताना रोहित-विराट

रोहित व विराट यांच्या छायाचित्राचा आधार घेऊन ट्विटर वापरकर्त्याने ते दोघे मुंबईतील लोकल ट्रेनने प्रवास करत आहेत असे भासवले. दुसऱ्या एका चाहत्याने ‘जेव्हा मी अचानक मोबाईलमध्ये पाहून हसतो, त्यावेळी माझे पालक असे पाहतात’, असा मिम शेअर केला. याव्यतिरिक्त अनेक वेगवेगळ्या घटनांचा संदर्भ देऊन रोहित व विराटचे हे छायाचित्र मिम्स स्वरूपात वापरले जात आहे.

https://twitter.com/manoj__45_/status/1357659156258254850?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1357659156258254850%7Ctwgr%5E%7Ctwcon%5Es1_&ref_url=https%3A%2F%2Fwww.lokmat.com%2Fcricket%2Findia-vs-england-1st-test-virat-kohli-rohit-sharmas-picture-chennai-test-sparks-hilarious-meme-fest-a593%2F

इंग्लंडने बनवली सामन्यावर पकड

इंग्लिश कर्णधार जो रूटने नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. युवा सलामीवीर रॉरी बर्न्स व डॉम सिबली त्यांनी संघाला अर्धशतकी सलामी दिली. चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या रूटने त्यानंतर सिबलीसोबत २०० पेक्षा अधिक धावांची भागीदारी करून पहिल्या दिवशी यजमान भारताला बॅकफूटवर ढकलले.

सामन्याच्या दुसऱ्या दिवशी अष्टपैलू बेन स्टोक्सने वेगवान अर्धशतक झळकावत इंग्लंडच्या डावाला आकार दिला. दुसऱ्या दिवशी अखेरच्या सत्राचा खेळ सुरू असताना इंग्लंडने ६ बाद ५११ धावा बनविल्या आहेत. बटलर नाबाद २६ तर बेस ८ धावांवर खेळत आहे.

महत्वाच्या बातम्या:

मला अवॉर्ड मिळणार नाही का? विराटच्या खिलाडूवृत्तीचं कौतुक होत असताना इंग्लिश गोलंदाजाची विनोदी प्रतिक्रिया

INDvsENG 1st Test: जो रुटच्या विक्रमी द्विशतकानंतर इंग्लंडचं शेपूटही वळवळलंच; दुसऱ्या दिवसाअखेर इंग्लंडच्या ८ बाद ५५५ धावा

थँक्यू नदीम! ज्याच्या निवडीवरून केली टीका तोच ठरला टीम इंडियाचा संकटमोचक

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---