---Advertisement---

दुसऱ्या टी20त फलंदाजी करताना शिवम दुबेला रोहित शर्माने दिला होता हा खास सल्ला

On: मंगळवार, डिसेंबर 10, 2019 4:55 PM
---Advertisement---

तिरुअनंतरपुरम। रविवारी(8 डिसेंबर) भारत विरुद्ध वेस्ट इंडिज(India vs West Indies) संघात ग्रिनफिल्ड आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर दुसरा टी20 सामना(2nd T20I) पार पडला. या सामन्यात वेस्ट इंडिजने 8 विकेट्सने विजय मिळवला.

या सामन्यात भारताने पराभव स्विकारला असला तरी भारताकडून अष्टपैलू क्रिकेटपटू शिवम दुबेने(Shivam Dube) शानदार फलंदाजीचे प्रदर्शन करत अर्धशतकी खेळी केली. त्याला या सामन्यात फलंदाजीसाठी तिसऱ्या क्रमांकावर बढती मिळाली होती.

त्यानेही या संधीचा पुरेपुर फायदा घेत 30 चेंडूत 54 धावांची आक्रमक अर्धशतकी खेळी केली. या खेळीत त्याने 3 चौकार आणि 4 षटकार मारले. हे त्याचे आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील पहिलेच अर्धशतक ठरले आहे.

शिवम या सामन्यात फलंदाजीला आल्यानंतर सुरुवातील धावा करण्यात झगडत होता. यादरम्यान त्याला भारताचा उपकर्णधार रोहित शर्माने संयमाने खेळण्याचा सल्ला दिला.

“तिसर्‍या क्रमांकावर फलंदाजीची संधी मिळणे ही माझ्यासाठी मोठी गोष्ट आहे. माझ्यावर नक्कीच दबाव होता. यानंतर रोहितने मला आपल्या सामर्थ्यानुसार खेळस असे सांगितले. त्याने मला एका वरिष्ठ खेळाडूप्रमाणे शांत होण्यास मदत केली,” असे शिवम म्हणाला.

https://twitter.com/mipaltan/status/1204260121871818753?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1204260121871818753&ref_url=https%3A%2F%2Fwww.hindustantimes.com%2Fcricket%2Findia-vs-west-indies-rohit-sharma-helped-me-shivam-dube-lauds-vice-captain-after-maiden-t20i-fifty%2Fstory-HuGE04UJcpUWCUjTAEEswJ.html

तसेच शिवम पुढे म्हणाला, ‘षटकार मारल्यानंतर मला लय मिळाली आणि मग मी माझा नैसर्गिक खेळ खेळत होतो. कोणत्याही मैदानात खेळण्यासाठी मी माझ्या क्षमतेला पाठिंबा देतो. तेच माझे सामर्थ्य आहे आणि मी नेहमीच असे खेळतो.’

याबरोबरच शिवमने या सामन्यानंतर बोलताना तो कोणत्याही मैदानावर मोठे फटके खेळण्यास सक्षम असल्याचा विश्वास व्यक्त केला होता.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---