भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात सुरू असलेल्या पाच सामन्यांच्या टी२० मालिकेत भारतीय संघ २-१ ने आघाडीवर आहे.भारताने तिसरा सामना ७ गडी राखून जिंकून ही आघाडी घेतली. या सामन्यात भारतीय संघाला मोठा धक्का बसला होता. पाठीच्या दुखापतीमुळे कर्णधार रोहित शर्मा ५ चेंडूत केवळ ११ धावा करून रिटायर्ड हर्ट झालेला. मात्र, आता भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) रोहितच्या फिटनेसबाबत अपडेट देत चाहत्यांना दिलासा दिला आहे.
बीसीसीआयने आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवर रोहितच्या सराव सत्राचे छायाचित्र पोस्ट केले आहे.या छायाचित्रात रोहित शर्मा फलंदाजी करताना दिसत आहे. तसेच, रिषभ पंत त्याला नेटबाहेर उभा राहून पाहत आहे. या छायाचित्राला ‘रोहित बॅट्स रिषभ वॉच”
बीसीसीआयने सांगितले होते की, कर्णधार रोहित शर्मा पाठीच्या दुखण्याने त्रस्त होता. आता तो बरा झाला असून पुढील दोन सामन्यांसाठी तो तंदुरुस्त आहे. वेस्ट इंडिजविरुद्ध तिसऱ्या सामन्यात चौकार मारल्यानंतर रोहितला काही वेदना जाणवल्या होत्या. पुढचा चेंडू खेळल्यानंतर तो फिजिओसोबत मैदानाबाहेर गेलेला. त्यानंतर तो पुन्हा मैदानात आलाच नाही.
Rohit bats, Rishabh watches 👀#TeamIndia | #WIvIND | @ImRo45 | @RishabhPant17 pic.twitter.com/1twNyIrvhF
— BCCI (@BCCI) August 5, 2022
या मालिकेतील शेवटचे दोन सामने अमेरिकेत खेळवले जाणार असून भारत आणि वेस्ट इंडिजचे संघ व्हिसाच्या समस्येनंतर तेथे पोहोचले आहेत. चौथा सामना ६ ऑगस्ट रोजी खेळवला जाईल, तर शेवटचा सामना ७ ऑगस्टला खेळवला जाईल.
चौथ्या सामन्यासाठी संभावित भारतीय प्लेइंग इलेव्हन-
रोहित शर्मा (कर्णधार), सूर्यकुमार यादव, संजू सॅमसन, रिषभ पंत, हार्दिक पंड्या, दिनेश कार्तिक, रविंद्र जडेजा, भुवनेश्वर कुमार, रविचंद्रन अश्विन, अर्शदीप सिंग, हर्षल पटेल.
महत्त्वाच्या बातम्या-
भारताची गोल्ड मेडलवर नजर! नाणेफेक जिंकत हरमनप्रीतने घेतला फलंदाजीचा निर्णय, पाहा प्लेइंग ११
विराटला टी२० विश्वचषकातूनही वगळणार! बीसीसीआयच्या मोठ्या अधिकाऱ्याचे खळबळजनक वक्तव्य
भारताला अंडर-१९ वर्ल्डकप जिंकवून देणारे कर्णधार आता आहेत तरी कुठे? एक तर झालायं निवृत्त