नेपाळचा फलंदाज रोहित पौडेल याला पुरूषांच्या राष्ट्रीय संघाचा कर्णधार करण्यात आले आहे. रोहितने माजी कर्णधार संदीप लामिछाने याची जागा घेतली आहे. नेपाळ क्रिकेट असोसिएशनने (सीएएन) शुक्रवारी (11 नोव्हेंबर) ट्वीटरमार्फत ही माहिती दिली.
संदीप लामिछाने (Sandeep Lamichhane) याला देशाच्या क्रिकेट प्रशासकीय मंडळाने 7 सप्टेंबर रोजी निलंबित केले होते. त्याच्यावर एका अल्पवयीन व्यक्तीने बलात्काराचा गुन्हा दाखल केल्यानंतर दोन आठवड्यांनंतरच त्याला संघातून काढण्यात आले. लामिछानेनंतर रोहित पौडेल (Rohit Paudel) याने केनिया विरुद्धच्या वनडे मालिकेत संघाचे नेतृत्व केले होते. त्याच्या नेतृत्वात संघाने मालिका 3-0 अशी जिकंली होती. नेपाळ क्रिकेट बोर्डने ट्वीट करते लिहिले, ‘रोहित पौडेल याला नेपाळच्या पुरूष क्रिकेट संघाचा कर्णधार म्हणून नियुक्त केले गेले आहे.’
लामिछाने सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत. त्याच्यावर फौजदारी संहिता (2074) च्या कलम 219 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोप सिद्ध झाल्यास त्याला 10 ते 12 वर्षे तुरुंगवास भोगावा लागेल.
रोहित या उजव्या हाताच्या फलंदाजाने 25 वनडे सामन्यात 808 धावा केल्या आहेत. त्यामध्ये एक शतक आणि 5 अर्धशतकांचा समावेश आहे. तसेच त्याने आंतरराष्ट्रीय टी20मध्ये 20 डावांमध्ये फलंदाजी करताना 376 धावा केल्या आहेत. तसेच तो उजव्या हाताचा मध्यमगती वेगवान गोलंदाज देखील आहे. त्याने आंतरराष्ट्रीय टी20मध्ये एक विकेट घेतली. त्याने टी20 लीगमध्ये 20 सामने खेळताना एक विकेट घेत 412 धावाही केल्या आहेत, तर लिस्ट ए चे 40 सामने खेळताना 1048 धावा केल्या आहेत.
Rohit Poudel has been appointed as the Captain of the Nepal Men's National Cricket Team. pic.twitter.com/rn03yNV5Kx
— CAN (@CricketNep) November 11, 2022
कर्णधाराच्या नियुक्तीबरोबर बोर्डने 16 सदस्यांचा वनडे संघही जाहीर केला आहे. युएई (युनायटेड अरब अमिराती) विरुद्ध ही वनडे मालिका 14 नोव्हेंबरपासून खेळली जाणार आहे. या मालिकेतील उर्वरित दोन सामने 16 आणि 18 नोव्हेंबरला किर्तीपूरमध्ये खेळले जाणार आहेत.
पौडेल याने 2018मध्ये आयसीसीच्या वर्ल्ड क्रिकेट लीगमधून नामिबियाविरुद्ध आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले आणि तो अफगाणिस्तानच्या राशिद खान नंतर वनडेचा दुसरा युवा कर्णधार ठरला. Rohit Paudel Named Nepal National Cricket Team Captain
राशिदने वयाच्या 19 वर्ष 165 दिवसांमध्ये स्कॉटलंड विरुद्ध संघाचे नेतृत्व केले होते. पौडेलचे वय 20 वर्ष 73 दिवस आहे.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
VIDEO: फिफा विश्वचषकात जेव्हा हिरविंग लोझॅनोच्या ‘त्या’ गोलमुळे मेक्सिकोमध्ये आला होता भूकंप!
विराट कोहलीच्या फलंदाजीवर भारताच्या दिग्गजाने उपस्थित केले प्रश्न, इंडियाचा उपांत्य फेरीत लाजिरवाणा पराभव