भारत विरुद्ध वेस्ट इंडिज (IND V WI) यांच्यात झालेल्या एकदिवसीय मालिकेत (ODI Series) टीम इंडियाने शानदार कामगिरी केली आणि मालिका आपल्या खिशात टाकली. रोहित शर्मा (Rohit Sharma) याच्या नेतृत्वाखाली झालेली तीन सामन्यांची मालिका भारतीय संघाने ३-० अशा फरकाने जिंकत पाहुण्या संघाला व्हाईट वॉशचा दणका दिला.
भारताच्या एकदिवसीय संघाचा पूर्णवेळ कर्णधार झाल्यानंतर रोहित शर्माच्या नेतृत्वात झालेली ही पहिलीच एकदिवसीय मालिका होती. ज्यात रोहितच्या अनुभवाचा कस लागला. तसेच, संघातील सर्व सहकाऱ्यांनी त्याला यशस्वी साथ दिल्याने भारताने वेस्ट इंडिजला अहमदाबादेतील तिनही वनडे सामन्यातही भारताने अक्षरशः लोळवले.
#TeamIndia put up an impressive show & win the ODI series 3⃣-0⃣! 👏 👏 #INDvWI @Paytm
3⃣ wickets each for @mdsirajofficial & @prasidh43
2⃣ wickets each for @deepak_chahar9 & @imkuldeep18Scorecard ▶️ https://t.co/9pGAfWtQZV pic.twitter.com/ybxG8wOhcj
— BCCI (@BCCI) February 11, 2022
हेही वाचा – IND v WI | टीम इंडियाचा ३-० फरकाने मालिका विजय, अंतिम वनडेत वेस्ट इंडिजचा दारुण पराभव
पहिला एकदिवसीय सामना सोडल्यास कर्णधार रोहितला फलंदाजीत तशी खास कामगिरी करता आली नाही. मात्र, नेतृत्व करणारा खेळाडू म्हणून तो नक्कीच यशस्वी झाल्याचे दिसून आले. तिसऱ्या सामन्यात विजय मिळवताच कर्णधार म्हणून रोहितने एक खास पराक्रम स्वतःच्या नावावर केला आहे. ज्या विक्रमासह त्याने माजी कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) यालाही मागे टाकले आहे.
रोहितने वेस्ट इंडिज विरुद्धच्या तीन सामन्यांसह एकूण १३ सामन्यात टीम इंडियाचे नेतृत्व केले. यात त्याने तब्बल ११ वेळा संघाला विजय मिळवून दिलाय. यासह १३ सामन्यात संघाचे नेतृत्व करत सर्वाधिक विजय (११) मिळवणारा तो क्रमांक एकचा भारतीय कर्णधार बनलाय. विराटने सुरुवातीच्या १३ सामन्यात १० विजय मिळवून दिले होते. त्यामुळे रोहितने विक्रमाच्या या यादीत विराटला मागे टाकले आहे. (Rohit Sharma 11 ODI Wins In 13 ODIs)
हेही वाचा – फलंदाजीत फ्लॉप, तरी रोहित-शिखरने रचला इतिहास! ‘असा’ कारनामा करणारी पहिलीच सलामी जोडी
जागतिक पातळीवरही रोहित दुसऱ्या क्रमांकावर…
सुरुवातीच्या एकूण १३ सामन्यात ११ विजय मिळवणारा कर्णधार रोहित शर्मा हा जागतिक पातळीवर या यादीत क्रमांक २ वर आहे. क्लाईव्ह लॉईड, इंझमाम उल हक आणि मिसबाह उल हक या तीन खेळाडूंनी त्यांच्या संघांचे सुरुवातीच्या १३ एकदिवसीय सामन्यात नेतृत्व करताना १२ विजय मिळवले होते. तर रोहित ११ विजयासह दुसऱ्या स्थानावर विराजीत आहे.
(Rohit Sharma 11 ODI Wins In 13 ODIs Virat Kohli Trailing With 10 Wins)
अधिक वाचा –
बिग ब्रेकिंग! दोन दिग्गज खेळाडू दुखापतीमुळे टी२० मालिकेबाहेर, पुणेकर खेळाडूला टीम इंडियात संधी