आयपीएल 2024 च्या आजच्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्स आणि मुंबई इंडियन्स आमनेसामने येणार आहेत. या सामन्यापूर्वी जेव्हा दोन्ही संघ स्टेडियममध्ये सराव करत होते, तेव्हा मुंबईचा माजी कर्णधार रोहित शर्मा यानं कोलकाताचा प्रशिक्षक आणि त्याचा जुना मित्र अभिषेक नायर याची भेट घेतली. यावेळी दोघांमध्ये झालेल्या संभाषणात मुंबई इंडियन्सचे सर्व गुपित उघड झाले आहेत.
आयपीएल 2024 पूर्वी पाच वेळच्या चॅम्पियन मुंबई इंडियन्सनं घोषणा केली होती की, ते रोहित शर्माच्या जागी हार्दिक पांड्याला कर्णधार म्हणून नियुक्त करत आहेत. मात्र, फ्रँचायझीचा हा निर्णय यशस्वी ठरला नाही. या निर्णयामुळे मुंबई इंडियन्सच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला. चाहते रोहितच्या समर्थनार्थ स्टेडियममध्ये आले आणि त्याच्या नावानं घोषणाबाजी सुरू केली. यावेळी हार्दिक पांड्याचीही खिल्ली उडवली गेली. पांड्याबद्दलचा द्वेष इतका वाढला होता की, वानखेडे स्टेडियमधील मुंबईच्या सामन्यापूर्वी माजी क्रिकेटपटू आणि समालोचक संजय मांजरेकर यांना चाहत्यांना चांगलं वागण्याचा सल्ला द्यावा लागला होता.
आता शनिवारी ईडन गार्डन्सवर कोलकाता नाईट रायडर्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यातील सामन्यापूर्वी सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये रोहित शर्मा केकेआरचे सहाय्यक प्रशिक्षक अभिषेक नायर यांच्याशी बोलताना दिसत आहे. व्हिडिओमध्ये चाहते रोहितच्या नावाची सतत घोषणा करत असल्यामुळे आवाज स्पष्ट ऐकू येत नाही. परंतु अस्पष्ट आवाजाद्वारेही अनेक गोष्टी उघड होत आहेत.
अभिषेक नायर यांच्याशी संभाषणादरम्यान रोहित म्हणतो, “प्रत्येक गोष्ट बदलत आहे (टीममध्ये बरंच काही बदललं आहे) … ते त्यांच्यावर अवलंबून आहे … जे काही आहे ते माझं घर आहे (मुंबई इंडियन्स माझं घर आहे), ते मंदिर आहे, जे मी बनवलं आहे. (मुंबईला 5 वेळा चॅम्पियन बनवलं)….भाऊ, माझं काय आहे, हे तर माझं शेवटचं आहे.”
व्हिडिओमध्ये रोहित मुंबई इंडियन्सच्या कर्णधारपदाबद्दल बोलत असल्याचा अंदाज लावला जात आहे. काही चाहत्यांनी असाही आरोप केला की, केकेआरनं हा व्हिडिओ ‘X’ या सोशल मीडिया साईटवर अपलोड केला होता. परंतु नंतर तो व्हिडिओ काढून टाकण्यात आला.
0:01 Ek ek chiz change ho raha hai,
0:04 Wo unke upar hai mujhe faraq nhi padta,
0:08 Mai to kahi jane nhi wala.
0:12 Jo bhi hai wo mera ghar hai bhai.
0:15 Jo temple maine banaya hai.
0:18 Muje kya ye to mera last h.Someone tell Rohit Sharma about fans. pic.twitter.com/LtvB6iMU73
— 𝐈conic𝗥ohit 𝕏 (@cap_x_mahesh) May 10, 2024
रोहित शर्मा आणि अभिषेक नायर हे मुंबईच्या स्थानिक क्रिकेटच्या दिवसांपासून चांगले मित्र आहेत. 2011 च्या एकदिवसीय विश्वचषकातून वगळल्यानंतर रोहितचं भारतीय संघात पुनरागमन करण्यात अभिषेक नायर यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती.
महत्त्वाच्या बातम्या –
‘थाला’ला भेटायला चाहता सरळ मैदानात! ‘माही’च्या पाया पडला अन्….हा व्हायरल व्हिडिओ नक्की पाहाच