आशिया चषक 2023 येत्या 30 तारखेलापासून सुरू होणार आहे. पाकिस्तान, नेपाळ आणि बांगलादेश या संघांनी आशिया चषकासाठी आपला संघ घोषित केला आहे. मात्र, भारतीय संघ अद्याप समजू शकला नाहीये. याच पार्श्वभूमीवर सोमवारी (21 ऑगस्ट) दिल्लीमध्ये निवड समितीची बैठक पार पडणार आहे. कर्णधार रोहित शर्मा आणि मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड या बैठकीसाठी उपस्थित राहणार, असेही सांगितले जात आहे.
माध्यमांतील वृत्तांनुसार सोमवारी (21 ऑगस्ट) दिल्लीमधील या बैठकीसाठी रोहित शर्मा (Rahul Dravid) आणि राहुल द्रविड (Rahul Dravid) यांना आमंत्रण आहे. प्रमुख निवडकर्ते अजित आगरकर (Ajit Agarkar) यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडणार असल्याचे समजते. भारतीय संघाची घोषणा अद्याप झाली नाही, कारण संघातील काही प्रमुख खेळाडू दुखापतग्रस्त आहेत. त्यातील जसप्रीत बुमराह याने आयर्लंडविरुद्धच्या मालिकेत पुनरागमन केले. मात्र, श्रेयस अय्यर आणि केएल राहुल अजूनही आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये परतले नाहीत. अशात या बैठकीत 15 सदस्यीय संघ निवडला जाणार की, अधिकच्या राखीव खेळाडूंचीही निवड केली जाणार, हे पाहण्यासारखे असेल.
केएल राहुल इंडियन प्रीमियर लीग 2023 दरम्यान, दुखापतग्रास्त झाला होता. तर दुसरीकडे मायदेशात ऑस्ट्रेलियाविरुद्ध कसोटी मालिका खेळताना श्रेयस अय्यर दुखापग्रस्त झाला होता. सध्या अय्यरच्या तुलनेत राहुल आशिया चषकात खेळण्यासाठी फिट असल्याचे सांगितले जात आहे. दुसरीकडे राहुल संघात पुनरागमन करू शकला नाही, तर त्याच्या जागी कोण? असाही प्रश्न सर्वांना पडला आहे. ईशान किशन आणि संजू सॅमसन आशिया चषक आणि त्यानंतर होणाऱ्या वनडे विश्वचषकासाठी संघात जागा मिळवू इच्छित आहेत. याबाबत दिल्लीत पार पडणाऱ्या बैठकीत काय निर्णय घेतला जातो, हे पाहण्यासारखे असेल. प्रमुख निवडकर्ते अजित आगरकर संघाची निवड झाल्यानंतर पत्रकार परिषद घेणार असल्याचेही सांगितले गेले आहे.
Ajit Agarkar is likely to attend the press conference after Asia Cup selection on the 21st. [Sports Tak] pic.twitter.com/U2mH33xCVQ
— Johns. (@CricCrazyJohns) August 19, 2023
दरम्यान, आघामी आशिया चषक स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान आणि नेपाळ संघ ग्रुप ए मध्ये आहेत. ग्रुप बी मध्ये श्रीलंका, बांगलादेश आणि अफगाणिस्तान संघ एकमेकाशी भिडतील. भारताला आपला पहिला सामना 2 सप्टेंबर रोजी कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानसोबत खेळायचा आहे. तत्पूर्वी 30 ऑगस्ट रोजी आशिया चषकाची सुरुवात होईल. (Rohit Sharma and Rahul Dravid will attend the meeting with the selectors to select the Asia Cup squad)
महत्वाच्या बातम्या –
विश्वचषकाची संधी हुकल्यानंतर ब्रूकची रिऍक्शन! म्हणाला, ‘स्टोक्स संघात आल्यामुळे मला…’
शोएब अख्तरने आपल्याच देशाला झाप झाप झापलं! म्हणाला, ‘पाकिस्तान क्रिकेट भारताच्याच पैशांवर…’