विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली खेळणारा भारतीय संघ ३ कसोटी सामन्यांची मालिका खेळण्यासाठी दक्षिण आफ्रिकेत दाखल झाला आहे. या ३ कसोटी सामन्यांच्या मालिकेला २६ डिसेंबर पासून प्रारंभ होणार आहे. तर ही मालिका झाल्यानंतर दोन्ही संघांमध्ये ३ वनडे सामन्यांची मालिका रंगणार आहे. रोहित शर्मा आणि रवींद्र जडेजा हे दोघेही दक्षिण आफ्रिकेविरुद्ध होणाऱ्या कसोटी मालिकेतून बाहेर आहेत. रोहित शर्माला सराव करताना दुखापत झाली होती. तर रवींद्र जडेजा न्यूझीलंड विरुद्ध झालेल्या कसोटी मालिकेत दुखापतग्रस्त झाला होता. आता हे दोघेही बेंगलोरला पोहोचले आहेत.
काही दिवसांपूर्वीच रोहित शर्माला वनडे संघाचे कर्णधारपद तर कसोटी संघाचे उपकर्णधारपद देण्यात आले आहे. या दौऱ्यावर तो चांगली कामगिरी करेल अशी आशा व्यक्त केली गेली होती. परंतु दौऱ्यावर रवाना होण्यापूर्वी मुंबईत सराव करत असताना त्याला गंभीर दुखापत झाली होती. ज्यामुळे तो कसोटी मालिकेतून बाहेर झाला आहे.
तर रवींद्र जडेजा न्यूझीलंड संघाविरुद्ध झालेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात दुखापतग्रस्त झाला होता. आता हे दोघेही दुखापतीतून सावरण्यासाठी बेंगलोरच्या नॅशनल क्रिकेट ॲकेडमीमध्ये पोहोचले आहेत. भारतीय १९ वर्षाखालील संघाचा कर्णधार यश धुलने त्यांच्यासोबतचे फोटो शेअर केले आहेत.
तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेनंतर तीन वनडे सामन्यांची मालिका देखील पार पडणार आहे. या मालिकेतील पहिला वनडे सामना १९ जानेवारी रोजी पार पडणार आहे. या मालिकेत रोहित शर्मा भारतीय संघाचे नेतृत्व करताना दिसून येणार आहे. तसेच पहिल्यांदाच विराट कोहली रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली खेळताना दिसून येणार आहे. अशी आशा व्यक्त केली जात आहे की, वनडे मालिका सुरू होण्यापूर्वी रोहित शर्मा आणि रवींद्र जडेजा हे फिट होऊन जातील.
असे आहे दक्षिण आफ्रिका विरुद्ध भारत मालिकेचे वेळापत्रक
कसोटी मालिका :
पहिला कसोटी सामना: २६-३० डिसेंबर २०२१ (सेंच्युरियन)
दुसरा कसोटी सामना : ३-७ जानेवारी,२०२२ (जोहान्सबर्ग)
तिसरा कसोटी सामना: ११-१५ जानेवारी,२०२२ (केपटाऊन)
वनडे मालिका
पहिला वनडे सामना: १९ जानेवारी,२०२१ (पार्ल)
दुसरा वनडे सामना: २१ जानेवारी,२०२१ (पार्ल)
तिसरा वनडे सामना : २३ जानेवारी, २०२१( केप टाऊन)
महत्वाच्या बातम्या :
दक्षिण आफ्रिका संघाला हादरा! प्रमुख खेळाडू पडला अखेरच्या दोन कसोटीतून बाहेर
तब्बल २०८ धावांचा पाठलाग करत पाकिस्तानने रचला इतिहास; पहिल्यांदाच केलाय असा कारनामा
पठ्ठ्याने चक्क पंचांनाच दिली जीवे मारण्याची धमकी; आता भोगतोय परिणाम





