---Advertisement---

रोहितकडून नववर्षाची दणक्यात सुरुवात! श्रीलंकेविरुद्ध स्वतःचे अर्धशतक, तर संघाचे पूर्ण केले शतक

On: मंगळवार, जानेवारी 10, 2023 3:10 PM
Rohit Sharma
---Advertisement---

भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा याने नव्या वर्षाची सुरुवात जोरदार केली. 2023 मधील पहिला सामना रोहितने श्रीलंकेविरुद्धच्या मंगळवारी (10 जानेवारी) खेळला. रोहित या सामन्यात नेहमीप्रमाणे भारताच्या डावाची सुरुवात करण्यासाठी आला आणि अर्धशतकीय खेळी साकारली. रोहित आणि शुबमन गिल यांनी संघाला चांगली सुरुवात देत एकही विकेट न गमावता 100 धावांपर्यंत पोहोचवले.

भारताने त्याचा मागचा वनडे सामना बांगालदेशविरुद्ध खेळला गेला. बांगलादेशविरुद्धच्या या सामन्यात ईशान किशन याने द्विशतकीय खेळी केली होती. पण तरीदेखील ईशानला श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या वनडेतून वगळण्यात आले. ईशानच्या जागी सलामीला आलेला शुबमन गिल (Shubman Gill) देखील त्याच्यावर दाखवण्यात आलेल्या विश्वासास पात्र ठरला. रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि शुबमन गिल यांनी संघाची धावसंख्या पहिल्या 10 षठकांमध्ये नाबाद 75 पर्यंत नेली. रोहितने 13 व्या षटकातील तिसऱ्या चेंडूवर चौकार मारून स्वतःचे अर्धशतक पूर्ण केले. त्याच्या वनडे कारकिर्दीतील हे 47 वे अर्धशतक ठरले.

https://twitter.com/BCCI/status/1612735200349519874?s=20&t=QcR5iXI12acr30vjEonlXQ

रोहित या सामन्यात चांगल्या फॉर्ममध्ये असून चाहते त्याला या जुन्या अंदाजात खेळताना पाहून खूपच आनंदी होते. रोहितने अर्शदक पूर्ण कऱण्यासाठी 41 चेंडू खेळले, ज्यामथ्ये 7 चौकार आणि 2 षटकारांचा समावेश होता. रोहितने संघासा चांगली सुरुवात दिल्यानंतर भारताने 14.5 षटकात 100 धावांचा टप्पा पार केला आणि यावेळी संघाने एकही विकेट गमावली नव्हती. सामन्याच्या 18 व्या षटकात रोहितपाठोपाठ शुबमन गिलने देखील अर्धशतक केले. गिलने 51 चेंडूत 4 चौकारांच्या मदतीने या 50 धावा केल्या.

https://twitter.com/BCCI/status/1612741347840258049?s=20&t=QcR5iXI12acr30vjEonlXQ

दरम्यान, उभय संघांतील सामन्याच्या सुरुवातील रोहितने नाणेपेक गमावल्यामुळे भारताला प्रथम फलंदाजी करावी लागली. श्रीलंकन संघाने प्रथम गोलंदाजी घेतली असली, तरी त्यांना सुरुवातीच्या षटकांमध्ये विकेट मात्र मिळाली नाही. रोहित आणि गिल या सलामीवीर जोडीने श्रींलंकन गोलंदाजांना चांगलाच घाम काढला. तत्पूर्वी रोहितला बांगलादेशविरुद्धच्या दुसऱ्या वनडे सामन्यात हाताच्या अंगठ्याला दुखापत झाली होती. रोहित या दुखापतीमुळे या सामन्यानंतर संघातून बाहेर होता. पण श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्याच वडने सामन्यात संघात पुनरागमन केले. रोहितव्यतिरिक्त विराट कोहली, केएल राहुल आणि मोहम्मद शमी यांनीदेखील या सामन्यातून संघात पुमरागन केले. (Rohit Sharma and Shubman Gill hit half-centuries to take the team to 100)

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
द्विशतकही नाही आलं कामी! गुवाहाटी वनडेत रोहितने ईशानला बसवले बाकावर
INDvSL: गुवाहाटीत रोहित-विराटच्या नावावर वनडे शतके; जाणून घ्या पिच रिपोर्ट, टॉसची भूमिका काय असेल

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---