भारतीय पुरुष क्रिकेट संघाचा वेस्ट इंडीज दौरा नुकताच संपला. वेस्ट इंडीजविरुद्धच्या एकदिवसीय आणि टी-२० मालिकेत भारताला घवघवीत यश मिळाले. दुसरीकडे भारताच्या महिला क्रिकेट संघानेही कॉमनवेल्थ गेम्समध्ये चमकदार कामगिरी केली. पण अंतिम सामन्यात त्यांना ऑस्ट्रेलियाकडून पराभव मिळाला. चाहते ज्या पद्धतीने हा सुवर्णपदकाचा सामना टक लावून पाहत होते, तशाच पद्धतीने भारतीय पुरुष संघही या सामन्यासाठी उत्सुक होता.
भारतीय क्रिकेट नियमाक मंडळ म्हणजेच बीसीसीआयने एक खास पोस्ट शेअर केली आहे, ज्यामध्ये कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) याच्या हातात फोन दिसत आहे. फोनवर भारतीय महिला संघ विरुद्ध ऑस्ट्रेलिया हा सुवर्णपदकाचा सामना सुरू आहे. रोहितच्या आजुबाजूने संघातील इतर खेळाडू आणि सपोर्ट स्टाफचे सदस्य दिसत आहेत. ड्रेसिंग रूममधील हा फोटो सध्या चांगलाच व्हायरल होत आहे. सर्व खेळाडूंना महिला संघाच्या विजयाची अपेक्षा, मात्र त्यांनी या सामन्यात ९ धावांनी पराभव स्वीकारला. ऑस्ट्रेलियन संघ सुवर्णपदकाचा मानकरी ठरला असून, भारतीय संघाला रौप्य पदकावर समाधान मानावे लागले.
Nail-biter at Edgbaston!
Senior Men's team is following #TeamIndia's progress in the #B2022 Final! 👍 👍#INDvAUS pic.twitter.com/TnOq9vcKXr
— BCCI (@BCCI) August 7, 2022
कॉमनवेल्थ गेम्समध्ये यावर्षी पहिल्यांदाच महिला क्रिकेटचा समावेश केला गेला होता आणि भारतीय संघाला अंतिम सामन्यापर्यंत मजल मारली. अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी केली. मर्यादीत २० षटकांमध्ये ऑस्ट्रेलियन संघाने ८ विकेट्सच्या नुकसानावर १६१ धावा केल्या. त्यांच्या संघासाठी बेथ मुनीने सर्वाधिक ६१ धावांचे योगदान दिले, तर कर्णधार मेग लेनिंग ३६ धावा केल्या. प्रत्युत्तरा भारतीय संघ १५२ धावांवर सर्वबाद झाला. कर्णधार हरमनप्रीत कौरने सर्वाधिक ६५ धावा केल्या, तर जेमिमा रॉड्रिग्सने ३३ धावांची खेळी केली.
दुसरीकडे भारत आणि वेस्ट इंडीज यांच्यातील पाचव्या आणि शेवटच्या टी-२० सामन्यात कर्णधार रोहित शर्मा खेळला नाही. रोहितला विश्रांती दिल्यामुळे हार्दिक पंड्याने या सामन्यात भारतीय संघाचे नेतृत्व केले आणि संघाला ८८ धावांच्या अंतराने विजय मिळवून दिला. सलामीसाठी आलेल्या श्रेयस अय्यरने जोरादर अर्धशतक केले. भारताने ७ विकेट्सच्या नुकसानावर १८८ धावा केल्या. प्रत्युत्तरात विंडीजचा संपूर्ण संघ १०० धावा करून बाद झाला. रवी बिश्नोईने या सामन्यात ४ विकेट्स घेतल्या, तर अक्षर पटेल आणि कुलदीप यादव यांनी प्रत्येकी तीन-तीन विकेट्स घेतल्या.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
आशिया चषकाचा संघ समोर आल्यानंतर टी-२० विश्वचषकाचे चित्र स्पष्ट? वाचा कसा असेल संघ
नशीबचं फुटके! चांगल्या प्रदर्शनानंतरही आशिया चषकातून बाहेर झाले ‘हे’ ५ भारतीय क्रिकेटर
INDvsPAK: पाकिस्तानचा सूड घेण्यास तयार आहेत भारत! आशिया चषकाच्या प्रोमोत दिसले रोहितचे रौद्ररूप