नुकताच भारतीय क्रिकेट संघाचा वेस्ट इंडिज दौरा संपला आहे. यानंतर काही दिवसांची विश्रांती घेतल्यानंतर भारतीय संघ आशिया चषक २०२२ च्या तयारीला लागेल. आशिया चषकासाठी भारताच्या १५ सदस्यीय संघाची घोषणाही करण्यात आली आहे. आता दुबईला रवाना होण्यापूर्वी संघात सहभागी सर्व खेळाडूंना बेंगलोर स्थित राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत फिटनेस चाचणी द्यावी लागली. ही चाचणी पास करणारे खेळाडूच दुबईला उड्डाण भरू शकतील.
मागील वेस्ट इंडिज दौऱ्यानंतर खेळाडूंना विश्रांती देण्यात आली आहे. त्यामुळे काही खेळाडू भारतात परतण्याऐवजी आपल्या कुटुंबियासोबत सुट्ट्यांचा आनंद लुटत आहेत. माध्यमांतील वृत्तांनुसार, सुट्ट्या संपल्यानंतर आशिया चषकासाठी संघात सहभागी सर्व खेळाडू १८ ऑगस्टला बेंगलोरमधील राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत पोहोचतील. येथे सर्व खेळाडूंची फिटनेस चाचणी होईल. खेळाडूंद्वारे घेतल्या गेलेल्या सुट्ट्यांनंतर त्यांच्यासाठी हा नियम पाळणे बंधनकारक आहे.
ही फिटनेस चाचणी उत्तीर्ण होणारे खेळाडू पुढे २ दिवसांनी अर्थात २० ऑगस्टला दुबईला रवाना होतील. पाकिस्तानविरुद्धच्या पहिल्या सामन्यापूर्वी भारतीय संघाचा दुबईत छोटा सराव शिबिर लावला जाईल.
आशिया चषक २०२२साठी भारतीय संघ
रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, रिषभ पंत, दीपक हुडा, दिनेश कार्तिक, हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, आर अश्विन, युझवेंद्र चहल, रवी बिश्नोई, भुवनेश्वर कुमार, अर्शदीप सिंग, आवेश खान.
स्टँडबाय – श्रेयस अय्यर, अक्षर पटेल आणि दीपक चहर.
आशिया चषक २०२२ चे वेळापत्रक:
पहिला सामना- श्रीलंका विरुद्ध अफगाणिस्तान (२७ ऑगस्ट, दुबई)
दुसरा सामना- भारत विरुद्ध पाकिस्तान (२८ ऑगस्ट, दुबई)
तिसरा सामना- बांगलादेश विरुद्ध अफगाणिस्तान (३० ऑगस्ट, शारजाह)
चौथा सामना- भारत विरुद्ध क्वालिफायर (३१ ऑगस्ट, दुबई)
पाचवा सामना- श्रीलंका विरुद्ध बांगलादेश (१ सप्टेंबर, दुबई)
सहावा सामना- पाकिस्तान विरुद्ध क्वालिफायर (२ सप्टेंबर, शारजाह)
सातवा सामना- बी१ विरुद्ध बी२, सुपर-४ (३ सप्टेंबर, शारजाह)
आठवा सामना- ए१ विरुद्ध ए२, सुपर-४ (४ सप्टेंबर, दुबई)
नववा सामना- ए१ विरुद्ध बी१, सुपर-४ (६ सप्टेंबर, दुबई)
दहावा सामना- ए२ विरुद्ध बी२, सुपर-४ (७ सप्टेंबर, दुबई)
अकरावा सामना- ए१ विरुद्ध बी२, सुपर-४ (८ सप्टेंबर, दुबई)
बारावा सामना- बी१ विरुद्ध ए२, सुपर-४ (९ सप्टेंबर, दुबई)
अंतिम सामना- पहिले सुपर-४ विरुद्ध दुसरे सुपर-४ (११ सप्टेंबर, दुबई)
महास्पोर्ट्सच्या व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
फिरकीपटूंसाठी मोठी बाधा आहे ‘हा’ पाकिस्तानी खेळाडू, आशिया चषकात संधी देण्याची होतीये मागणी
‘खेळाडूंनी संघाकडून खेळण्यासाठी भीक…’, विंडीज कोच सिमन्स यांनी असे का म्हटले? वाचा सविस्तर
कॅप्टन म्हणून सुपर किंग्समध्ये प्लेसिसचे पुनरागमन! राशिदही एमआय फॅमिलीचा सदस्य