लॉर्ड्सच्या ऐतिहासिक मैदानावर इंग्लंड विरुद्ध भारत या दोन्ही संघांमध्ये ५ कसोटी सामन्यांच्या मालिकेतील दुसरी लढत झाली. या सामन्यात भारतीय संघाने १५१ धावांनी विजय मिळवला. तसेच मालिकेत १-० अशी आघाडी घेतली. दरम्यान जॉनी बेअरस्टो बाद होऊन माघारी परतल्यानंतर रोहित शर्मा आणि विराट कोहली यांनी गळाभेट घेतल्याचे पाहायला मिळाले होते. त्यांचा हा फोटो सध्या व्हायरल होत आहे.
इंग्लंड विरुद्ध भारत यांच्यात झालेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यातील शेवटच्या दिवशी (१६ ऑगस्ट) भारतीय गोलंदाजांनी अप्रतिम कामगिरी करत इंग्लंड संघाला नेस्तनाभूत केले. सुरुवातीला मोहम्मद शमी आणि जसप्रीत बुमराह यांनी तुफान फटकेबाजी करत भारतीय संघाला २९८ धावांपर्यंत पोहचवले. त्यानंतर २७२ धावांचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या इंग्लिश फलंदाजांना एकापाठोपाठ एक माघारी धाडत १२० धावांवर सर्वबाद केले.
विराट आणि रोहित यांची गळाभेट
इंग्लंड संघाकडून २७२ धावांचा पाठलाग करताना कर्णधार जो रूटला जॉनी बेअरस्टोने साथ देण्याचा प्रयत्न केला. परंतु, तो फारकाळ साथ देऊ शकला नाही. तर झाले असे की, २२ व्या षटकातील शेवटच्या चेंडूवर ईशांत शर्माने अप्रतिम चेंडू टाकला, तो जॉनी बेअरस्टोच्या पॅडला जाऊन धडकला होता. भारतीय खेळाडूंनी पंचांकडे जोरदार मागणी केली, परंतु पंचांनी मान हलवून नकार दिला होता.
त्यानंतर विराटने डीआरएस घेण्याची मागणी केली. डीआरएसमध्ये स्पष्टपणे दिसून आले की, चेंडू यष्टीला जाऊन धडकला आहे. त्यामुळे पंचांना आपल्या निर्णयात बदल करावा लागला होता. मोठ्या स्क्रीनवर बादचा निर्णय पाहून भारतीय संघातील खेळाडूंच्या उत्साहात भर पडली होती. या उत्साहात रोहित शर्मा आणि विराट कोहली एकमेकांना मिठी मारताना दिसून आले होते.(Rohit sharma and Virat Kohli celebration after Jonny Bairstow departs, watch video)
https://twitter.com/Manikanta141999/status/1427285666140868620
Rohit – Virat hug was special too 🥰 pic.twitter.com/HkCQD52EiV
— sohom (@AwaaraHoon) August 16, 2021
Virat was going ahead, probably Rohit called him & then the hug😍😍 pic.twitter.com/HNvUWeWupS
— թɾíվαα (@koffeeinsane) August 16, 2021
What a review 💙💙
That hug from Virat to Rohit 🤗#INDvENG #ENGvIND— Mumbai cha Mulga (@CricketBiryani) August 16, 2021
https://twitter.com/callahan_baron/status/1427280602701697030
Hug between Rohit and Virat
— Dhruv Sahu (@DhruvSahu550) August 16, 2021
#IndvsEng 4th wicket jony Bairstow gone pic.twitter.com/LaLL6JajeM
— Kundan Kumar (@KundanK60149918) August 16, 2021
भारतीय गोलंदाजांची अप्रतिम कामगिरी
जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद शमी यांनी फलंदाजीमध्ये मोलाचे योगदान दिल्यानंतर गोलंदाजीमध्येही संघाला चांगली सुरुवात करून दिली होती. २७२ धावांचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या इंग्लंड संघाला जसप्रीत बुमराहने पहिला धक्का दिला. त्याने रॉरी बर्न्सला भोपळाही न फोडता माघारी धाडले होते. तसेच डोम सिब्लेला देखील मोहम्मद शमीने ० धावांवर माघारी धाडले होते.
त्यानंतर कर्णधार जो रूटने हमीद सोबत मिळून डाव सावरण्याचा प्रयत्न केला. परंतु, ही जोडी ही फार काळ टिकू शकली नाही. ईशांत शर्माने हमीदला ९ धावांवर माघारी धाडले त्यानंतर जॉनी बेअरस्टोला देखील अवघ्या २ धावांवर माघारी धाडले होते. कर्णधार जो रूटवर हा सामना पुढे घेऊन जायची जबाबदारी होती. परंतु, तो देखील फार काळ टिकू शकला नाही. तो ३३ धावा करत माघारी परतला. त्यानंतर फलंदाजीला आलेला जोस बटलर एकहाती झुंज देताना दिसून आला. मात्र, त्यालाही सिराजने माघारी धाडले आणि अखेरीस सिराजने अँडरसनला बाद करत इंग्लंडचा डाव संपवला.
महत्त्वाच्या बातम्या –
क्रिकेटच्या पंढरीत विजय मिळवताच ‘कर्णधार’ कोहलीच्या नावावर ‘मोठा’ विक्रम; क्लाईव्ह लॉईडला टाकलं मागे
अरर! जो रुटचे शतक होऊनही इंग्लंडवर पहिल्यांदाच ओढवली ‘अशी’ नामुष्की