---Advertisement---

ENG vs IND: रोहित आणि विराट यांनी लॉर्ड्सवर रचला इतिहास, 400 सामने खेळणारी ठरली पहिली भारतीय जोडी

On: रविवार, जुलै 19, 2026 5:42 PM
---Advertisement---

लॉर्ड्स क्रिकेट ग्राउंडवर रविवारी (19 जुलै) क्रिकेट रसिकांना ऐतिहासिक क्षण अनुभवण्याची संधी मिळाली. येथे भारत आणि इंग्लंड यांच्यात मालिकेतील शेवटचा आणि मालिका निर्णायक तिसरा वनडे सामना खेळला जात आहे. या सामन्यासाठी भारताच्या अंतिम अकरामध्ये रोहित शर्मा आणि विराट कोहली यांचा समावेश झाला असता त्यांच्या नावावर विश्वविक्रमाची नोंद झाली आहे.

रोहित आणि विराट हे एकत्र 400 आंतरराष्ट्रीय सामने खेळणारी पहिली भारतीय जोडी ठरली आहे. तसे त्यांनी याआधीच भारतासाठी एकत्र सर्वाधिक आंतरराष्ट्रीय सामने खेळण्याचा विक्रम आपल्या नावे केला होता. त्यांनी एकत्र 391 सामने खेळणाऱ्या सचिन तेंडुलकर आणि राहुल द्रविड यांना मागे टाकले होते.

रोहित आणि विराट यांनी आंतरराष्ट्रीय टी 20 आणि कसोटी क्रिकेटच्या प्रकारामधून निवृत्त्या घेतल्या असून दोघे भारतासाठी केवळ वनडे प्रकारच्या सामन्यात खेळतात. आपल्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीला विराम देण्याआधी दोघांचा भारतासाठी 2027 विश्वचषक जिंकण्याचे ध्येय आहे.

जागतिक विक्रम ‘या’ दिग्गजांच्या नावावर
जागतिक क्रिकेटची यादी पाहिली तर श्रीलंकेचे दिग्गज कुमार संगकारा आणि महेला जयवर्धने यांच्या नावावर एकत्र सर्वाधिक आंतरराष्ट्रीय सामने खेळण्याचा विक्रम आहे. त्यांनी 550 आंतरराष्ट्रीय सामने एकत्र खेळले आहेत. त्यांच्यानंतर दुसरी जोडी श्रीलंकेचीच आहे. जयवर्धने आणि तिलकरत्ने दिलशान यांनी 426 आंतरराष्ट्रीय सामने एकत्र खेळले आहेत. तिसऱ्या आणि चौथ्या स्थानवरही श्रीलंकेच्याच जोड्या आहेत.

या यादीत पाचव्या स्थानी दक्षिण आफ्रिकेचे जॅक कॅलिस आणि मार्क बाऊचर आहेत, तर भारताची स्टार जोडी सहाव्या स्थानी आहे.

प्रमुख जागतिक जोड्या (आंतरराष्ट्रीय स्तरावरील एकूण सामने)
1) कुमार संगकारा आणि महेला जयवर्धने (श्रीलंका) – 550 सामने
2) महेला जयवर्धने आणि तिलकरत्ने दिलशान (श्रीलंका) – 426 सामने
3) कुमार संगकारा आणि तिलकरत्ने दिलशान (श्रीलंका) – 418 सामने
4) सनथ जयसूर्या आणि मुथय्या मुरलीधरण (श्रीलंका) – 408 सामने
5) जॅक कॅलिस आणि मार्क बाऊचर (दक्षिण आफ्रिका) – 407 सामने
6) रोहित शर्मा आणि विराट कोहली (भारत) – 400* सामने
(Rohit sharma and Virat kohli create history at Lord’s; become first Indian pair to play 400 matches together eng vs ind 3rd odi)

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---