भारतीय संघाचा नवा मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीरनं (Gautam Gambhir) रोहित शर्मानंतर (Rohit Sharma) विराट कोहलीला (Virat Kohli) श्रीलंकेत एकदिवसीय मालिका खेळण्यासाठी राजी केलं आहे. याआधी विराट आणि रोहित श्रीलंकेविरुद्ध 3 सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळणार नसल्याची बातमी समोर येत होती. मात्र, नवीन प्रशिक्षक गंभीरच्या विनंतीवरुन भारताचे दोन्ही दिग्गज फलंदाज आता निवडीसाठी उपलब्ध झाले आहेत.
रिपोर्टनुसार, रोहितनंतर विराट कोहलीही श्रीलंका दौऱ्यावर एकदिवसीय मालिका खेळणार असल्याचे निश्चित झाले आहे. तत्पूर्वी असा रिपोर्ट आला होता की, 6 महिने सतत क्रिकेट खेळल्यामुळे विराट कोहली, रोहित शर्मा आणि जसप्रीत बुमराह श्रीलंकेविरुद्ध 3 सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळणार नाहीत. तिन्ही दिग्गजांना विश्रांती देण्यासाठी बोर्ड तयार आहे.
परंतू, त्यानंतर बातमी समोर आली की, रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि आता विराट कोहली (Virat Kohli) श्रीलंकेविरुद्धची एकदिवसीय मालिका खेळण्यासाठी तयार झाले आहेत. तर जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) श्रीलंका दौऱ्यावर टी20 आणि एकदिवसीय मालिका खेळणार नाही.
भारतानं यंदाचा टी20 विश्वचषक जिंकल्यानंतर भारताचे दोन दिग्गज फलंदाज रोहित शर्मा आणि विराट कोहली यांनी टी20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. या दोघांशिवाय भारताचा दिग्गज अष्टपैलू रवींद्र जडेजानेही (Ravindra Jadeja) टी20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा केले. तर रोहित आणि विराट भारतासाठी एकदिवसीय आणि कसोटी क्रिकेट खेळत राहणार आहेत.
महत्त्वाच्या बातम्या-
एकदिवसीय क्रिकेटमध्ये वेगवान द्विशतक ठोकणारे टाॅप-5 खेळाडू! दोन भारतीय खेळाडूंचाही समावेश
व्हायचं होतं फलंदाज पण झाले मात्र गोलंदाज! या 2 भारतीय खेळाडूंची कहाणी खूपच रंजक
RCBला चॅम्पियन बनवणाऱ्या खेळाडूचा आज वाढदिवस…! भारतासाठीही ठोकल्या 7000+ धावा