---Advertisement---

टी20 संघाच्या कर्णधारपदाच्या शर्यतीत नाव आघाडीवर असताना सूर्यकुमारची सूचक इंस्टा स्टोरी, होतेय चर्चा

Suryakumar-Yadav
---Advertisement---

Suryakumar Yadav Cryptic Instagram Story : यशस्वी झिम्बाब्वे दौऱ्यानंतर 27 जुलैपासून भारतीय संघाला श्रीलंकेचा दौरा करायचा आहे. या दौऱ्यावर भारतीय संघाला श्रीलंकेविरुद्ध 3 सामन्यांची टी20 मालिका आणि 3 सामन्यांची वनडे मालिका खेळायची आहे. नवे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांच्या प्रशिक्षणाखाली भारतीय संघ या मालिकेत उतरेल. मात्र अद्याप या मालिकांसाठी भारतीय संघाची घोषणा झालेली नाही. असे असले तरीही, टी20 मालिकेसाठी स्टार फलंदाज सूर्यकुमार यादव याची कर्णधारपदी नियुक्ती होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. हे सर्व सुरु असताना सूर्यकुमार यादवनं ठेवलेल्या इन्स्टाग्राम स्टोरीची चर्चा आहे.

माध्यमांतील वृत्तांनुसार, टी20 विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात मॅच विनिंग झेल टिपणारा क्रिकेटपटू सूर्यकुमारचं नाव कॅप्टन पदाच्या शर्यतीत आघाडीवर असल्याचे म्हटले जात आहे. भारतीय संघाचे नवे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांनी सूर्यकुमार यादव याला कर्णधारपदाचा दावेदार म्हटल्याचे समजत आहे. तसेच सूर्यकुमार निवड समितीचीही पहिली पसंती असल्याचे वृत्त आहे. याव्यतिरिक्त माजी टी20 कर्णधार रोहित शर्मा हादेखील सूर्यकुमारला भावी कर्णधार करण्याच्या पक्षात असल्याचे समोर येत आहे.

भारतीय संघाचा मधल्या फळीतील फलंदाज सूर्यकुमार हा एक स्फोटक फलंदाज आहे. त्याने आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटमध्ये 167 च्या स्ट्राइक रेटने एकूण चार शतके आणि 19 अर्धशतकेही केली आहेत. त्याची आक्रमक फलंदाजी दबावाच्या परिस्थितीत खूप उपयुक्त ठरते. त्याच वेळी, भारताचा कर्णधार असताना सूर्यकुमारने 7 टी20 सामन्यांपैकी 5 सामने जिंकले आहेत. थोडक्यात आकडेवारी आणि प्रशिक्षक व निवड समितीचे समर्थन सूर्यकुमारच्या बाजूने असल्याने त्याचे पारडे जड आहे.

यादरम्यान सूर्यकुमारने एक इन्स्टाग्राम स्टोरी ठेवलेली आहे. यात त्याने देवाचा फोटो इन्स्टाग्रामवर ठेवत त्याला अभिवादन केले आहे. त्याच्या या स्टोरीमुळे सूर्यकुमारने कर्णधारपदी आपली निवड होणार असल्याने देवाचे आभार मानले असावेत, असा अंदाज चाहते वर्तवत आहेत.

महत्वाच्या बातम्या-

पाकिस्तानच्या धमक्यांना घाबरले नाही बीसीसीआय! चॅम्पियन्स ट्रॉफीबाबत मोठी अपडेट, भारत ‘या’ देशात खेळणार सामने
कर्णधारपदाबाबत नवा ट्विस्ट! सूर्या-हार्दिकच्या मध्ये रोहित शर्माची मध्यस्थी, म्हणाला…
18 वर्षाच्या गोलंदाजापुढे बाबर आझम ढेपाळला, पाहा व्हिडिओ

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---