---Advertisement---

रोहित, रितीकाने असा साजरा केला लाडक्या लेकीचा वाढदिवस; विराटची पत्नी कमेंट करत म्हणाली…

On: गुरूवार, डिसेंबर 30, 2021 5:42 PM
Samaira Sharma Birthday
---Advertisement---

भारताचा सध्या दक्षिण आफ्रिका दौरा (India Tour Of South Africa) चालू आहे. या दौऱ्यावर भारतीय खेळाडूसोबत त्यांच्या पत्नी आणि कुटुंबातील इतर सदस्यही गेले आहेत. मात्र दुखापतीमुळे सलामीवीर रोहित शर्मा (Rohit Sharma) या दौऱ्यातील सुरुवातीच्या कसोटी मालिकेसाठी अनुपलब्ध आहे. त्यामुळे तो सध्या त्याच्या कुटुंबासोबत वेळ घालवतो आहे. नुकताच रोहितच्या मुलीचा (Rohit’s Daughter Birthday), समायरा शर्मा (Samaira Sharma)चा वाढदिवस होता. तिच्या वाढदिवसाला अनेक खेळाडूंच्या पत्नींनी तिला शुभेच्छा दिल्या आहेत.

रोहित शर्मा आणि त्याची पत्नी रितिका सजदेह यांच्या मुलीचा आज (३० डिसेंबर) तिसरा वाढदिवस आहे. ते आज मुलीचा वाढदिवस साजरा करत आहेत. रितिकाने केक कापतानाचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. हा फोटो शेअर केल्यावर चाहत्यांनीही तिला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

रोहित शर्माच्या पत्नी रितिका सजदेहने मुलीचा वाढदिवसाचा फोटो सोशल मीडियावर शेअर करताना लिहिले की, ‘आज रो आणि माझी सर्वोत्कृष्ट व्यक्ती ३ वर्षांची झाली आहे. बाळा तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.’

https://www.instagram.com/p/CYGTfy6ILiZ/?utm_source=ig_web_button_share_sheet

यावर दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर गेलेल्या भारताच्या कसोटी संघाचा कर्णधार विराट कोहलीची पत्नी अनुष्का शर्मासह अनेक खेळाडूंच्या पत्नींनी तिला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. अनुष्का शर्मा हिने वाढदिवसाच्या शुभेच्छा देत एक गुलाबी कलरच्या दिलचा ईमोजी शेअर केला आहे. यासोबतच सागरिका घाटगे, पृथ्वी नारायण आणि अनुष्का शर्मा या क्रिकेटपटूंच्या पत्नींनी या पोस्टवर कमेंट करून वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.

हेही वाचा- जशी आहेस, तशीच राहा..! बड्डेदिनी रोहित शर्माच्या पत्नी रितिकाला प्रेमळ शुभेच्छा

रितीकाचाही डिसेंबरमध्येच झाला वाढदिवस
तत्पूर्वी २१ डिसेंबर रोजी रोहितची पत्नी (Rohit Sharma’s Wife) रितिकाचा वाढदिवस (Ritika Sajdeh’s Birthday) होता. यानिमित्ताने रोहितने इंस्टाग्राम खात्यावरून एक खास पोस्ट करून त्याच्या पत्नीला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या होत्या.

रोहितने त्याच्या स्वतःच्या अधिकृत इंस्टाग्राम खात्यावरून रितिकाचा एक खास फोटो शेअर केला आणि तिला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या होत्या. पोस्टमध्ये रोहितने रितिकाची स्तुती केली होती आणि ती जशी आहे तशीच राहावी, असे असे म्हटले होते. त्याने पोस्टच्या कॅप्शनमध्ये लिहिले होते की, “माझ्या आयुष्यातील एकमेव प्रेमाला वाढदिवसाच्या शुभेच्छा. तू जशी आहेस, तशीच राहा, हीच गोष्ट तुला खूप आकर्षक बनवते.”

महत्त्वाच्या बातम्या-

बाबा विराटला चीयर करण्यासाठी पहिल्यांदाच वामिका स्टेडियममध्ये, आई अनुष्कासोबत कॅमेरात कैद

“याला आत्ताच बाद करायचं”, विराटने दिले आदेश अन् बुमराहने केला चमत्कार

कोण असेल वर्षातील सर्वोत्तम वनडे क्रिकेटपटू? ‘या’ चार खेळाडूंमध्ये स्पर्धा, पण भारतीयाचा समावेश नाही

हेही पाहा-

हे आहेत भारतीय गोलंदाज, पण फलंदाजी करताना कसोटीत केलंय शतक | Indian Bowlers Who Made Test Century

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---