आशिया चषक 2022 मध्ये भारत आणि पाकिस्तान संघ रविवारी (4 सप्टेंबर) दुसऱ्यांदा आमने सामने आले. पाकिस्तानने हा सामना 5 विकेट्सने जिंकला. भारतीय संघाचा युवा वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंग याने सामन्यात चांगली गोलंदाजी केली, पण एक महत्वाचा झेल सोडल्यामुळे चाहते त्याला ट्रोल करत आहेत. कर्णधार रोहित देखील हा झेल सुडल्यानंतर चिडल्याचे दिसले होते. परंतु सामना गमावण्यासाठी अर्शदीपला एकट्याला जबाबदार म्हणता येणार नाही. संघातील इतर खेळाडूंनी देखील काही चुका केल्या. स्वतः रोहितने देखील ती चूक पुन्हा एकदा केली, जी त्याने पाकिस्तानविरुद्धच्या पहिल्या सामन्यात केली होती.
पाकिस्तानविरुद्धच्या या सामन्यात अर्शदीप सिंग (Arshdeep Singh) याने सोडलेला झेल, ही भारतीय संघाची मोठी चूक होती. पाकिस्तानच्या डावातील 18 व्या षटकातील तिसऱ्या चेंडूवर त्याने आसिफ अली (Asif Ali) याचा झेल सोडला. आसिफ अलीने या सामन्यात 8 चेंडूत 16 धावा केल्या आणि विकेट गमावली. अर्शदीपने झेल सोडल्यामुळे पाकिस्तानचा विजय सोपा बनला असला, तरी त्याच्या एकट्याच्या चुकीमुळे भारताने हा सामना गमावला नाहीये. हार्दिक पंड्या, सूर्यकुमार यादव आणि रिषभ पंत यांना अपेक्षित धावा करता आल्या नाहीत. तसेच कर्णधार रोहितची एक मोठी चूकही संघाला महागात पडल्याचे दिसते.
रोहित शर्माने केलेल्या चूक लक्षात घेतली, तर त्याने ग्रुप स्टेजमध्ये पाकिस्तानविरुद्ध खेळताना मर्यादित वेळेत 20 षटके पूर्ण केली नव्हती. षटकांची गती राखता न आल्यामुळे भारताने या सामन्यातील शेवटच्या तीन षटकांमध्ये 30 यार्ड सर्कलच्या आत एक अतिरिक्त खेळाडू उभा केला होता. आता सुपर फोरमध्ये पाकिस्तानविरुद्ध खेळताना रोहितने पुन्हा एकदा हीच चूक केली. षटकांची गती राखता आली नाही, भारताला शेवटच्या षटकात 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये 4 ऐवजी 5 खेळाडूंना उभे करावे लागले होते.
Rohit expression= whole india expression 😢😢
#INDvsPAK #RohitSharma #Arshdeep pic.twitter.com/WJ43N5w2py— Shubhankar Mishra (@shubhankrmishra) September 4, 2022
सुपर फोरमधील पहिल्या सामन्यात भारताला पाकिस्तानकडून पराभव स्वीकारावा लागला असला, तरी संघाकडून अजून दोन सामने आहेत. 6 सप्टेंबर रोजी भारत आणि श्रीलंका संघ आमने सामने असतील, तर 8 सप्टेंबर रोजी भारतीय संघ अफगाणिस्तानविरुद्ध खेळेल. अंतिम सामन्यात पोहोचण्यासाठी भारताला पुढचे दोन्ही सामने जिंकावे लागतील. संघाची अजून एक चूक त्यांना स्पर्धेतून बाहेर करू शकते.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
एका कॅचमुळे खलनायक ठरलेल्या अर्शदीपची विराटकडून पाठराखण; म्हणाला, ‘दबावात कोणा…’
धोनी, कोहलीने जे कमावलं, ते रोहितने झटक्यात गमावलं; 8 वर्षांनंतर पाकिस्तानने भारताला झुकवले
…आणि भांडुपमधील मध्यमवर्गीय कुटूंबातील पोरगी १७व्या वर्षी भारताकडून खेळू लागली