---Advertisement---

…म्हणून रोहित शर्मा आणि दक्षिण आफ्रिकेचे नाते आहे खास!

On: मंगळवार, ऑक्टोबर 1, 2019 3:24 PM
---Advertisement---

विशाखापट्टणम। उद्यापासून(2 ऑक्टोबर) भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका संघात(India vs South Africa) 3 सामन्यांची कसोटी मालिका सुरु होणार आहे. या कसोटी मालिकेतील पहिला सामना उद्या विशाखापट्टणम येथे भारतीय प्रमाणवेळेनुसार सकाळी 9.30 वाजता सुरु होणार आहे.

या सामन्यासाठी आज(1 ऑक्टोबर) बीसीसीआयने 11 जणांचा भारतीय संघ घोषित केला आहे. या सामन्यात रोहित शर्माला सलामीवीर म्हणून खेळणार आहे. त्यामुळे त्याच्याबाबतीत एक खास योगोयोग होणार आहे.

रोहितने याआधी कसोटी कारकिर्दीत सलामीला फलंदाजी केलेली नाही. तो उद्या पहिल्यांदाच कसोटीमध्ये सलामीवीर म्हणून खेळेल.

विशेष म्हणजे रोहितने वनडे क्रिकेटमध्ये सर्वात पहिल्यांदा सलामीला फलंदाजी दक्षिण आफ्रिकेविरुद्धच केली होती. तो 18 जानेवारी 2011 मध्ये दक्षिण आफ्रिका विरुद्ध केपटाऊनला झालेल्या वनडे सामन्यात पहिल्यांदाच सलामीवीर म्हणून खेळला होता.

त्यानंतर आता जवळ जवळ 8 वर्षांनी रोहित दक्षिण आफ्रिकेविरुद्धच पहिल्यांदा कसोटीत सलामीवीर म्हणून खेळणार आहे.

रोहितने भारतासाठी मर्यादीत षटकांच्या क्रिकेटमध्ये मागील अनेक वर्षांपासून सलामीला फलंदाजी केली आहे. यामध्ये रोहितला मोठे यशही मिळाले आहे. त्याने वनडेमध्ये सलामीवीर म्हणून आत्तापर्यंत 134 सामन्यात 57.42 च्या सरासरीने 6719 धावा केल्या आहेत. तर टी20मध्ये सलामीवीर म्हणून 67 सामन्यात 33.49 च्या सरासरीने 2043 धावा केल्या आहेत.

क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.

महत्त्वाच्या बातम्या – 

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी एमएस धोनीचे केले या शब्दात कौतुक

पंत-साहापैकी या खेळाडूला मिळाली संधी; द. अफ्रिकेविरुद्ध पहिल्या कसोटीसाठी टीम इंडियाची घोषणा

ठरलं! यादिवशी होणार आयपीएल २०२०चा लिलाव

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---

Leave a Comment