---Advertisement---

…म्हणून रोहित शर्मा आला तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला

On: रविवार, फेब्रुवारी 2, 2020 1:14 PM
---Advertisement---

माऊंट मॉनगनुई। आज(2 फेब्रुवारी) न्यूझीलंड विरुद्ध भारत संघात पाचवा आणि शेवटचा टी20 सामना बे ओव्हल स्टेडियमवर सुरु आहे. या सामन्यात भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.

या सामन्यात आज भारताचा नियमित सलामीवीर फलंदाज रोहित शर्मा तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला आला. यामागील कारण रोहितने नाणेफेकीवेळी स्पष्ट केले. या सामन्यात भारताचा नियमित कर्णधार विराट कोहलीला विश्रांती देण्यात आली आहे. त्यामुळे रोहित आज भारतीय संघाचे नेतृत्व करत आहे.

रोहितला चौथ्या टी20 सामन्यासाठी विश्रांती देण्यात आली होती. पण आता आज विराटने विश्रांती घेतल्याने रोहितचे भारतीय संघात पुनरागमन झाले आहे. हा एकमेव बदल भारताच्या 11 जणांच्या संघात आज झाला आहे.

याबद्दल नाणेफेकीवेळी बोलताना रोहितने तो तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी येणार असल्याचेही सांगितले. तो म्हणाला, ‘आज केवळ एक बदल झाला आहे. माझा आज विराट ऐवजी संघात समावेश झाला आहे. त्यामुळे आज संजू सॅमसन केएल राहुलसह सलामीला फलंदाजी करेल आणि मी तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करेल.’

रोहितला चौथ्या टी20 सामन्यात विश्रांती देण्यात आल्याने त्या सामन्यातही राहुलसह सॅमसनने सलामीला फलंदाजी केली होती. मात्र सॅमसनला या संधीचा फायदा घेण्यात अपयश आले आहे. तो चौथ्या सामन्यात सलामीला फलंदाजी करताना 8 धावा करुन बाद झाला. तर आज त्याला केवळ 2 धावा करण्यात यश आले.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---