भारत आणि बांगलादेश संघात दुसरा एकदिवसीय सामना बुधवारी (दि. 7 डिसेंबर) ढाका येथे खेळला गेला. या सामन्यात भारताला 5 धावांनी पराभव स्वीकारावा लागला. बांगलादेश संघाची फंलदाजी सुरु असताना भारताचा कर्णधार रोहित शर्मा याला झेल पकडताना दुखापत झाली. त्यामुळे भारताच्या फलंदाजीच्यावेळी विराट कोहली याला सलामीसाठी यावे लागले. रोहित आपल्या क्रिकेट कारकीर्दीत पहिल्यांदा इतक्या खालच्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आला होता आणि या क्रमांकावर येऊन त्याने 28 चेंडूत 51 धावा केल्या. या डावात त्याने 3 चौकार आणि 5 उत्तुंग षटकार मारले. त्याच्या या 5 षटकारांमुळे त्याचे नाव भारताच्या क्रिकेट इतिहासात लिहिले गेले. भारतासाठी पहिल्यांदा 500 षटकार मारणारा तो पहिला फलंदाज ठरला आहे.
रोहित शर्मा (Rohit Sharma) याने भारतासाठी आणखी एक पराक्रम करुन दाखवला. त्याने भारतासाठी सर्वात आधी 500 षटकार ठोकले. बांगलादेश विरुद्ध एकदिवसीय सामन्यात त्याने 5 षटकार लगावले होते आणि त्यासोबतच 502 षटकारही पूर्ण केले.
या आधी आंतरराष्ट्रीय सामन्यात भारतासाठी षटकारांचा पल्ला गाठणारे भारतीय फलंदाज खालील प्रमाणे
50 षटकार- कपिल देव (Kapil Yadav)
100 षटकार- कपिल देव
150 षटकार- सचिन तेंडूलकर (Sachin Tendulkar)
200 षटकार-सौरव गांगुली (Saurav Ganguly)
250 षटकार- सचिन तेंडूलकर
300 षटकार- एमएस धोनी (MS Dhoni)
350 षटकार- रोहित शर्मा
400 षटकार- रोहित शर्मा
450 षटकार- रोहित शर्मा
500 षटकार- रोहित शर्मा
बागंलादेश संघाच्या फलंदाजीच्या वेळी रोहित याला झेल घेताना दुखापत झाली. अंगठ्याला झालेल्या गंभीर दुखापतीमुळे रोहित फलंदाजीसाठी येऊ शकणार नाही. मात्र, संघ अडचणीत सापडलेला असल्याने रोहित 9व्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आला. अडचणीत सापडलेल्या भारतीय संघाला रोहित याने केलेल्या फटकेबाजीमुळे विजयाची चिन्हे दिसली. मात्र, 49व्या षटक मोहम्मद सिराज (Mohammed Siraj) याने निर्धाव घातले. त्यामुळे शेवटच्या षटकात भारताला 5 धावांनी पराभव स्वीकारावा लागला.(Rohit Sharma became first Indian to smash 500 sixes)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
मुंबई इंडियन्स पुनरागमनासाठी तयार! मागच्या हंगामातील सुमार प्रदर्शनानंवर मुख्य प्रशिक्षकांनी बनवला गेमप्लॅन
भारताने सामना गमावला, पण केएल राहुलच्या ‘या’ कॅचची सर्वत्र होतेय चर्चा