राजकोट। भारत विरुद्ध बांगलादेश संघात(India vs Bangladesh) गुरुवारी झालेल्या दुसऱ्या टी20 सामन्यात(2nd T20I) भारतीय संघाने 8 विकेट्सने विजय मिळवला. तसेच 3 सामन्यांच्या टी20 मालिकेत(T20I Series) 1-1 अशी बरोबरी केली. भारताच्या या विजयात भारताचा प्रभारी कर्णधार रोहित शर्माने अर्धशतकी खेळी करत महत्त्वाचा वाटा उचलला.
सौराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर(Saurashtra Cricket Association Stadium, Rajkot) झालेल्या या सामन्यात रोहित शर्माने (Rohit Sharma) 43 चेंडूत 85 धावांची खेळी केली. या खेळीत त्याने 6 चौकार आणि 6 षटकार मारले.
'कॅप्टनकूल' धोनीचा टी२०तील हा मोठा विक्रम 'हिटमॅन' रोहित शर्माने मोडला!
वाचा????https://t.co/LakD47jQbl#म #मराठी #Cricket @Mazi_Marathi @beyondmarathi #INDvBAN #TeamIndia #Cricket #RohitSharma— Maha Sports (@Maha_Sports) November 8, 2019
याबरोबरच त्याने आंतरराष्ट्रीय टी20मध्ये 2500 धावांचा टप्पाही पार केला आहे. हा टप्पा पार करणारा तो जगातील पहिलाच क्रिकेटपटू ठरला आहे.
त्याचे आता आंतरराष्ट्रीय टी20मध्ये 100 सामन्यात 32.52 च्या सरासरीने 2537 धावा झाल्या आहेत. यामध्ये त्याच्या 4 शतकांचा आणि 18 अर्धशतकांचा समावेश आहे.
आंतरराष्ट्रीय टी20मध्ये सर्वाधिक धावा(Most Runs in T20I) करण्याचा विश्वविक्रमही रोहितच्या नावावर आहे. या यादीत रोहितच्या पाठोपाठ 2450 धावांसह विराट कोहली(Virat Kohli) दुसऱ्या क्रमांकावर आहे.
विशेष म्हणजे गुरुवारी झालेला हा टी20 सामना रोहितचा आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील 100 वा टी20 सामना(100th T20I) होता. त्यामुळे 100 आंतरराष्ट्रीय टी20 सामने खेळणारा तो भारताचा केवळ दुसरा क्रिकेटपटू ठरला. याआधी भारतीय महिला क्रिकेटपटू हरमनप्रीत कौरने(Harmanpreet Kaur) असा कारनामा केला आहे.
#आंतरराष्ट्रीय टी20मध्ये सर्वाधिक धावा करणारे क्रिकेटपटू –
2537 – रोहित शर्मा (सामने 100)
2450 – विराट कोहली (सामने 72)
2359 – मार्टिन गप्टिल (सामने 82)
2263 – शोएब मलिक (सामने 111)
2140 – ब्रेंडन मॅक्यूलम (सामने 71)
महत्त्वाच्या बातम्या-
विराट रन मशिन आहे तर रोहित सिक्स मशिन आहे, हा आहे पुरावा
वाचा???? https://t.co/dx9tETqDxV#म #मराठी #Cricket @Mazi_Marathi @beyondmarathi #INDvBAN #TeamIndia #Cricket #RohitSharma— Maha Sports (@Maha_Sports) November 8, 2019
रोहितचा १००वा टी२० सामना टीम इंडियासाठीही ठरलाय खास, जाणून घ्या कारण
वाचा???? https://t.co/TB2EqUUGWe#म #मराठी #Cricket @Mazi_Marathi @beyondmarathi #INDvBAN #TeamIndia— Maha Sports (@Maha_Sports) November 8, 2019






