---Advertisement---

हिटमॅनचा हटके अंदाज, रोहित शर्मा बनला कॅमेरामॅन: VIDEO VIRAL

On: शनिवार, मार्च 29, 2025 3:22 PM
---Advertisement---

रोहित शर्मा जिथे असेल तिथे मजा आणि धमाल सुरू झाली तर आश्चर्य वाटायला नको. रोहितची हीच शैली पुन्हा एकदा पाहायला मिळाली आहे. तो आता कॅमेरामनच्या अवतारात गुजरात टायटन्स (GT) सपोर्ट स्टाफसोबत मजा करत आहे आणि त्याचा एक मनोरंजक व्हिडिओ मुंबई इंडियन्स (MI) ने शेअर केला आहे. ‘हिटमॅन’ म्हणून प्रसिद्ध असलेला रोहित ‘डेडली ग्रुप’चा फोटो काढण्यासाठी बेचैन झालेला दिसत आहे. आयपीएल 2025 चा नववा सामना आज शनिवारी गुजरात आणि मुंबई यांच्यात खेळला जाणार आहे. दोन्ही संघ अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर आमनेसामने येतील.

व्हिडिओमध्ये असे दिसून येते की जेव्हा रोहितला सराव सत्रादरम्यान थोडा वेळ मिळाला तेव्हा त्याने फोटो काढण्याचा आग्रह धरला. ‘हिटमॅन’ने गुजरातचे मुख्य प्रशिक्षक आशिष नेहरा, संघ व्यवस्थापक सत्यजित परब, सहाय्यक प्रशिक्षक पार्थिव पटेल, जीटी क्रिकेट संचालक विक्रम सोलंकी यांना एकत्र बोलावले आणि एक फोटो क्लिक केला.

आज गुजरात आणि मुंबई चालू हंगामातील त्यांचा दुसरा सामना खेळतील. दोघांनीही आपल्या मोहिमेची सुरुवात पराभवाने केली होती. पहिल्या सामन्यात पंजाब किंग्जने गुजरातचा 11 धावांनी पराभव केला. 244 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना जीटीने 232 धावा केल्या होत्या.तर मुंबईला पहिल्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्ज (CSK) विरुद्ध 4 विकेट्सने पराभव स्वीकारावा लागला. सीएसकेने पाच चेंडू शिल्लक असताना 156 धावांचे लक्ष्य पूर्ण केले. सीएसके विरुद्ध मुंबई सामन्यात रोहितचे खाते उघडले गेले नाही.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---