भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्या दरम्यानच्या 4 सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना नागपूर येथे खेळला गेला. पाच दिवसांचा कसोटी सामना भारताने तिसऱ्याच दिवशी आपल्या नावे केला. या सामन्यात भारताने एक डाव आणि 132 धावांनी दणदणीत विजय साकारला. भारतीय डावात कर्णधार रोहित शर्मा याने शानदार शतकी खेळी केली होती. आधी शतक व आता विजयानंतर त्याने थेट भारताचा सर्वकालीन महान फलंदाज सचिन तेंडुलकर याचाच मोठा विक्रम मागे सोडला.
नागपूर कसोटीत ऑस्ट्रेलियन संघाने पहिल्या डावात फलंदाजी करताना 177 धावा केल्या. त्याला प्रत्युत्तर देताना भारताने पहिल्या दिवशी 1 बाद 77 धावा काढल्या होत्या. रोहितने 69 चेंडूवर नाबाद 56 धावा पहिल्या दिवशी केलेल्या. त्यानंतर दुसऱ्या दिवशी मात्र त्याने संयम दाखवत 177 चेंडूंमध्ये शतक पूर्ण केले. यामध्ये 14 चौकार व 2 षटकारांचा समावेश होता. बाद होण्यापूर्वी रोहितने आपल्या कारकिर्दीतील नवव्या शतकात 120 धावा केल्या. यामध्ये 15 चौकार व 2 षटकारांचा समावेश होता. हे त्याच्या कसोटी कारकिर्दीतील 9 वे शतक होते.
त्यानंतर आता भारतीय संघाने विजय मिळवल्यानंतर रोहित हा भारताचा सर्वात यशस्वी सलामीवीर बनला आहे. रोहितने सलामीवीर म्हणून शतक झळकावल्यानंतर भारतीय संघाची विजयी होण्याची ही 31 वी वेळ ठरली. यापूर्वी सचिन तेंडुलकर याने सलामीवीर म्हणून झकावलेल्या शतकांतील 30 सामने जिंकले होते. या यादीमध्ये तिसऱ्या क्रमांकावर भारताचा माजी क्रिकेटपटू वीरेंद्र सेहवाग आहे. त्याने झळकावलेल्या शतकांपैकी 21 शतकांवेळी भारताला विजय संपादन करण्यात यश आलेले.
रोहितच्या आजवरच्या कारकिर्दीचा विचार केल्यास त्याने 9 कसोटी शतके, 30 वनडे शतके व 4 शतके झळकावली आहेत. सध्या सक्रिय क्रिकेटपटूंमध्ये तो विराट कोहलीनंतर सर्वात जास्त शतके ठोकणारा खेळाडू आहे. विराटने आत्तापर्यंत 73 शतके आपल्या नावे केली आहेत.
(Rohit Sharma Becomes Most Successful Indian Opener In The Manner Of Won Matches After Openers Century)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
मोहम्मद शमीची आश्चर्यकारक आकडेवारी, कसोटीत ठोकलेत विराट आणि द्रविडपेक्षा जास्त षटकार
भारत वि. ऑस्ट्रेलिया : पहिल्या कसोटीत भारताचा शानदार विजय, पाहुण्या संघाची धुळधाण उडवत मालिकेत 1-0 अशी आघाडी