काल भारत आणि पाकिस्तान यांच्यात एशिया कप 2018 चा सुपर फोरचा सामना पार पडला. या सामन्यात भारताने 9 विकेट्सने विजय मिळवला.
या सामन्यात पाकिस्तानचा कर्णधार सरफराज अहमदने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला होता. मात्र या सामन्यात त्याचा हा निर्णय अपयशी ठरला.
पाकिस्तानचे ठराविक अंतराने गडी बाद होत गेले. शोएब मलिकच्या 78 धावांच्या जोरावर पाकिस्तानच्या संघाने 237 चा आकडा गाठला. प्रत्युतरादाखल हे आव्हान भारताने 1 गड्याच्या मोबदल्यात सहज पार केले.
या सामन्यात भारताचा कर्णधार रोहीत शर्माने 111 धावांची नाबाद खेळी केली. आपल्या या खेळीने भारताच्या विजयात महत्वाचे योगदान देत त्याने अनोखा विक्रम आपल्या नावावर केला आहे.
भारतीय कर्णधार म्हणून पाकिस्तानविरुद्ध वनडेत एका डावात सर्वाधिक धावा करणाऱ्या कर्णधारांच्या यादीत त्याने भारताचा माजी कर्णधार एमएस धोनी नंतर दुसरे स्थान पटकावले आहे. त्याने महान फलंदाज सचिन तेंडूलकर आणि मोहम्मद अझरूद्दिन यांना मागे टाकले आहे.
धोनीने 30 डिसेंबर 2012 ला चेन्नईमध्ये पाकिस्तान विरूद्ध कर्णधार म्हणून खेळताना 113 धावांची खेळी केली होती. तर रोहितने रविवारी 111 धावांची खेळी केली आहे. त्याच्या खालोखाल मोहम्मद अझरूद्दिन यांनी 101 आणि 100 आणि सचिन तेंडूलकर 93 धावांचा समावेश आहे.
पाकिस्तान विरूद्ध भारतीय कर्णधार म्हणून एका डावात केलेल्या सर्वोच्च धावा –
113 धावा – महेंद्रसिंग धोनी – चेन्नई
111 धावा – रोहीत शर्माने – दुबई
101 धावा – मोहम्मद अझरूद्दिन – टोरोंटो
100 धावा – मोहम्मद अझरूद्दिन – ढाका
93 धावा – सचिन तेंडूलकर – हॉबर्ट
महत्वाच्या बातम्या –
–एशिया कप २०१८: ४ दिवसांत पाकिस्तानचा टीम इंडियाकडून दोनदा दारुण पराभव
–…आणि पाकिस्तानचे चाहते जोरदार भडकले
-पृथ्वी शॉ, श्रेयस अय्यरने रेल्वेला धु-धु धुतले, मुंबईचा ४०० धावांचा डोंगर