---Advertisement---

‘सलामीवीर’ रोहित शर्माचे नाव आता त्या ४ दिग्गज भारतीयांमध्ये सन्मानाने घेतले जाणार!

On: बुधवार, जानेवारी 29, 2020 2:18 PM
---Advertisement---

हॅमिल्टन। आज(26 जानेवारी) भारत विरुद्ध न्यूझीलंड संघात तिसरा टी20 सामना सेडन पार्क येथे होत आहे. या सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 5 बाद 179 धावा केल्या. भारताकडून सलामीवीर फलंदाज रोहित शर्माने अर्धशतकी खेळी करताना खास पराक्रम केला आहे.

रोहितने या सामन्यात 40 चेंडूत 6 चौकार आणि 3 षटकारांसह 65 धावांची खेळी केली. याबरोबरच त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सलामीवीर म्हणून 10 हजार धावांचा टप्पाही पार केला. हा टप्पा पार करणारा तो चौथा भारतीय सलामीवीर फलंदाज ठरला. याआधी सचिन तेंडूलकर, विरेंद्र सेहवाग आणि सुनील गावस्कर यांनी हा पराक्रम केला आहे.

रोहितने आतंरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सलामीवीर म्हणून खेळताना 219 व्या डावात हा कारनामा केला. त्यामुळे तो आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वात जलद 10 हजार धावा करणारा दुसऱ्या क्रमांकाचा सलामीवीर फलंदाज ठरला आहे. या यादीत अव्वल क्रमांकावर मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकर आहे. सचिनने सलामीवीर म्हणून 214 व्या डावात 10 हजार आंतरराष्ट्रीय धावांचा टप्पा पार केला होता.

रोहितच्या आता आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सलामीवीर म्हणून 221 सामन्यातील 219 डावात 50.33 च्या सरासरीने 10017 धावा झाल्या आहेत.

#आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वात जलद 10 हजार धावा करणारे सलामीवीर – 

214 डाव – सचिन तेंडूलकर

219 डाव – रोहित शर्मा

233 डाव – सुनील गावस्कर

235 डाव – गोर्डन ग्रीनिज

236 डाव – मॅथ्यू हेडन

#आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारे भारतीय सलामीवीर फलंदाज –

15758 धावा – विरेंद्र सेहवाग

15335 धावा – सचिन तेंडूलकर

12258 धावा – सुनील गावस्कर

10017 धावा – रोहित शर्मा

9591 धावा – शिखर धवन

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---