भारत विरुद्ध श्रीलंका (IND vs SL) यांच्यातील पहिला कसोटी (First Test) सामना रविवारी (०६ मार्च) पार पडला. मोहालीच्या पंजाब क्रिकेट असोसिएशन आयएस बिंद्रा स्टेडियमवर झालेला हा सामना भारताने १ डाव आणि २२२ धावांच्या मोठ्या (Team India’s Big Win) अंतराने जिंकला. या विजयासह भारताने २ सामन्यांच्या कसोटी मालिकेत १-० अशी आघाडीही घेतली आहे. हा सामना विजय भारताचा कर्णधार रोहित शर्मा (Captain Rohit Sharma) याच्यासाठी विक्रमी ठरला आहे. कारण हा रोहितचा कसोटी कर्णधार म्हणून पहिलाच सामना (Rohit Sharma First Test Win) होता.
असा झाला भारत वि. श्रीलंका सामना
या सामन्यात भारताच्या ५७५ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना श्रीलंकेचा संघ पहिल्या डावात १७४ धावांवरच गारद झाला. परिणामी भारताने श्रीलंकेला फॉलोवॉन दिला. मात्र श्रीलंकेचा संघ दुसऱ्या डावातही १७८ धावाच करूच शकला.
भारत आणि श्रीलंकेतील पहिल्या कसोटी सामन्यात नाणेफेक जिंकून भारताने प्रथम फलंदाजी निवडली होती. भारताकडून पहिल्या डावात अष्टपैलू रविंद्र जडेजा याने सर्वाधिक धावा केल्या. त्याने सातव्या क्रमांकावर फलंदाजीला येत २२८ चेंडूत ३ षटकार आणि १७ चौकारांच्या मदतीने नाबाद १७५ धावा चोपल्या. त्याच्या साथीला अष्टपैलू आर अश्विननेही खालच्या फळीत तुफानी ६१ धावांची अर्धशतकी खेळी केली.
तत्पूर्वी डावाच्या सुरुवातीला मधल्या फळीत यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंत याने ९६ धावा फटकावल्या. तर तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या हनुमा विहारीनेही ५८ धावांनी संथ खेळी केली. भारतीय संघाने ५७४ धावांवर डाव घोषित केला.
https://twitter.com/BCCI/status/1500425654269276165?s=20&t=OpoiXkwI7sXQUmDZDhIKyg
भारताच्या भल्यामोठ्या ५७५ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना श्रीलंकेच्या संघाला २०० धावाही करता आल्या नाहीत. फिरकी अष्टपैलू जडेजाने फलंदाजीनंतर गोलंदाजीतही दम दाखवत श्रीलंकेला कमी धावांवर रोखले. त्याने श्रीलंकेच्या पहिल्या डावात १३ षटके गोलंदाजी करताना ४१ धावा देत ५ विकेट्स घेतल्या. तसेच जसप्रीत बुमराह आणि आर अश्विनने प्रत्येकी २ विकेट्सचे योगदान दिले. या डावात श्रीलंकेकडून एकटा पथुम निसांका अर्धशतक करू शकला. तो ६१ धावांवर नाबाद राहिला. अशाप्रकारे ६५ षटकांमध्ये १७४ धावांवर सर्वबाद झालेल्या श्रीलंकन संघाला भारताने फॉलोअप दिला.
दुसऱ्या डावात श्रीलंकेकडून यष्टीरक्षक निरोशन डिकवेलाने एकाकी झुंज दिली. परंतु तो संघाचा पराभव टाळू शकला नाही. तो दुसऱ्या डावात ८१ चेंडूंमध्ये ९ चौकारांच्या मदतीने ५१ धावा करत नाबाद राहिला. या डावात भारताकडून फिरकीपटू आर अश्विन आणि रविंद्र जडेजा यांनी प्रत्येकी ४ विकेट्स घेतल्या.
हेही वाचा- पहिली कसोटी: भारताने श्रीलंकेचा उडवला धुव्वा, फक्त ३ दिवसातच १ डाव आणि २२२ धावांनी जिंकला सामना
रोहित ठरला असे करणारा दुसराच भारतीय कर्णधार
अशाप्रकारे तब्बल १ डाव आणि २२२ धावांच्या मोठ्या फरकाने पहिलाच कसोटी सामना जिंकत कर्णधार रोहितने मोठा पराक्रम केला आहे. तो पॉली उम्रिगर यांच्यानंतर कर्णधार म्हणून पहिल्याच कसोटीत डावाच्या फरकाने सामना जिंकणारा केवळ दुसराच संघनायक बनला आहे. उम्रिगर यांनी १९५५-५६ मध्ये मुंबई येथे न्यूझीलंडविरुद्ध कसोटी कर्णधार म्हणून पदार्पण केले होते. त्यांच्या नेतृत्त्वाखाली भारतीय संघाने १ डाव आणि २७ धावांनी हा सामना जिंकला होता.
याखेरीज कर्णधार म्हणून पहिल्याच कसोटी सामन्यात सर्वात मोठा विजय मिळवण्याच्या विक्रमातही रोहित दुसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे. या विक्रमात त्याने मॉन्टी बाउडेन आणि लॉर्ड हॉक यांना मागे टाकले आहे. बाउडेन यांनी १८८९ मध्ये १ डाव २०२ धावांनी त्यांचा पदार्पणाचा कसोटी सामना जिंकला होता. तर माजी कर्णधार हॉक यांनी १९८६ मध्ये एक डाव १९७ धावांनी सामना जिंकत या विक्रमात आपले नाव नोंदवले होते. तसेच रिडले जेकब एक डाव ३०१ धावांच्या मोठ्या विजयासह या विक्रमात अव्वलस्थानी आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
पहिली कसोटी: भारताने श्रीलंकेचा उडवला धुव्वा, फक्त ३ दिवसातच १ डाव आणि २२२ धावांनी जिंकला सामना
आजच्याच दिवशी ५१ वर्षांपूर्वी टीम इंडियाला मिळाला होता हिरा, ज्याने बदलला क्रिकेटचा चेहरामोहरा
एकावन्न वर्षांपूर्वी आंतरराष्ट्रीय पदार्पण करणाऱ्या गावसकरांबद्दल या ५ गोष्टी माहित आहेत का?






