कोणत्याही क्रिडापटूच्या यशस्वी कारकिर्दीमागे त्याच्या संघर्षाची कहाणी दडलेली असते. कित्येक लेखक, पत्रकार अथवा चित्रपट दिग्दर्शक वेगवेगळ्या माध्यमातून त्यांचा संघर्ष जगापुढे आणण्याच्या प्रयत्नात असतात. एमएस धोनीच्या जीवनावर आधारित बनलेला ‘एमएस धोनी- द अनटोल्ड स्टोरी’ हा चित्रपट याचे उत्तम उदाहरण आहे. आता ‘हिटमॅन’ नावाने ओखळला जाणारा रोहित शर्मा याच्या प्रवासावर आधारित एक पुस्तक प्रकाशित झाले आहे.
प्रसिद्ध क्रिडा लेखक विजय लोकापल्ली आणि जी कृष्णन यांनी रोहितच्या क्रिकेट प्रवासावर आधारित पुस्तक लिहिले आहे. ‘द हिटमॅन- द रोहित शर्मा स्टोरी’ असे या पुस्तकाचे नाव आहे. या पुस्तकात रोहितच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील पदार्पणापासून ते आतापर्यंतचा प्रवास दिलेला आहे.
या पुस्तकाचे प्रकाशक म्हणाले की, “या पुस्तकात आम्ही रोहितच्या प्रवासाची कहाणी नमूद केली आहे. ज्या मेहनतीने आणि आत्मविश्वासाने त्याने भारतीय संघातील आपले स्थान पक्के केले, यामागचा संघर्ष आम्ही येथे टिपला आहे. त्याच्यातील आक्रमकता आणि सतर्कता यांचे मिश्रण शानदार आहे. तो सदैव आपल्या मोठ-मोठ्या शॉट्सद्वारे मैदानावर नाविण्य आणत असतो.”
“याचबरोबरच येत्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यावरुन रोहितवर झालेली टिका, त्याला मिळालेला पाठिंबा. तसेच त्याने मेहनतीने दुखापतीतून सावरुन क्रिकेटमध्ये केलेले पुनरागमन या सर्वांचा या पुस्तकात उल्लेख करण्यात आला आहे. अमेझॉन या ई-कॉमर्स वेबसाइटवर हे पुस्तक उपलब्ध आहे,” असे शेवटी त्यांनी सांगितले.
महत्त्वाच्या बातम्या-
रोहित शर्मा जाऊ शकतो ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर; ‘या’ खेळाडूऐवजी मिळू शकते संधी
…आणि मनीष पांडेने केली विराट कोहलीची बोलती बंद, पाहा व्हिडिओ
बापरे! धोनीची एक धाव सीएसकेला पडली ७.५ लाखांना, तर १ कोटी ४१ लाखांना ‘या’ गोलंदाजाची विकेट
ट्रेंडिंग लेख-
भारतीय फलंदाजांना नडणाऱ्या ब्रेट लीबद्दल या खास गोष्टी माहित आहेत का?
‘या’ पाच खेळाडूंची आरसीबीतून होऊ शकते हकालपट्टी, एक नाव आहे धक्कादायक
RCB च्या कर्णधारपदी कुणाची लागू शकते वर्णी? ही ३ नावे चर्चेत