fbpx
Wednesday, January 20, 2021
Maha Sports
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
Maha Sports
No Result
View All Result
ADVERTISEMENT

रोहित शर्माने तोडला धोनीचा ‘हा’ विक्रम, आता गेल, डिविलियर्सच्या विक्रमावर आहे नजर

September 24, 2020
in IPL, क्रिकेट, टॉप बातम्या
0
Photo Courtesy: www.iplt20.com

Photo Courtesy: www.iplt20.com


मुंबई । रोहित शर्मा सामन्यात खेळला आणि कोणताही विक्रम होऊ शकला नाही, असे आजकाल होऊच शकत नाही. बुधवारी( 22 सप्टेंबर) कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध मुंबई इंडियन्सचा कर्णधार असलेल्या रोहितची बॅट पुन्हा चालली. त्याने 54 चेंडूत 80 धावांची तडफदार खेळी करत मुंबईला आयपीएलच्या १३ व्या हंगामाचा पहिला विजय मिळवून दिला. या शानदार खेळीसाठी रोहितला सामनावीर म्हणून गौरविण्यात आले. यासह, त्याने आयपीएलमधील सर्वाधिक सामनावीर पुरस्काराच्या बाबतीत एमएस धोनीला मागे टाकले.

आयपीएलमधील सर्वाधिक वेळा सामनावीर

रोहित आयपीएलमध्ये 18 व्या वेळी सामनावीर ठरला. आयपीएलमध्ये कोणत्याही भारतीय खेळाडूला इतक्या वेळा हा पुरस्कार मिळालेला नाही. याआधी धोनी आणि रोहितने प्रत्येकी 17 वेळा सामनावीर पुरस्कार मिळवला होता. पण आता रोहितने बुधवारी कोलकाता विरुद्ध सामनावीर पुरस्कार मिळवत धोनीला मागे टाकले आहे.

तसे, आयपीएलमध्ये जर आपण सर्वात जास्त सामनावीर पुरस्कार मिळवणाऱ्या खेळाडूंबद्दल बोललो तर ख्रिस गेलच्या नावावर हा विक्रम आहे. हा पुरस्कार त्याने 21 वेळा जिंकला आहे. यानंतर एबी डिव्हिलियर्स येतो. त्याच्या नावावर 20 सामनावीर पुरस्कार आहेत. या यादीत आता रोहित शर्मा आता तिसर्‍या क्रमांकावर आला आहे. तर धोनी आणि डेव्हिड वॉर्नर 17 सामनावीर पुरस्कारांसह संयुक्तरित्या चौथ्या क्रमांकावर आहेत. युसुफ पठाणला 16 वेळा सामनावीर पुरस्कार मिळाला आहे.

आयपीएलमध्ये 200 षटकार

इंडियन प्रीमियर लीगच्या 5व्या सामन्यात मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्माने 80 धावांची खेळी साकारली. यादरम्यान त्याने 6 षटकार आणि 3 चौकार लगावले.  रोहित शर्माने केकेआरच्या गोलंदाजांचा चांगलाच समाचार घेतला. या सामन्यात रोहित शर्माने आयपीएलचे 200 षटकार पूर्ण केले. आयपीएलमध्ये 200 षटकार ठोकणारा रोहित शर्मा चौथा खेळाडू आहे. याआधी गेल, डिव्हिलियर्स आणि धोनी यांनी त्याच्या आधी हा पराक्रम केला आहे.


Previous Post

दहा कोटींना खरेदी केलेला आरसीबीचा ‘हा’ शिलेदार दुसऱ्या सामन्याला देखील मुकणार?

Next Post

सूर्यकुमार यादव ‘अशी’ कामगिरी करणारा मुंबई इंडियन्सचा ठरला सातवा खेळाडू

Related Posts

Photo Courtesy: Twitter/@ICC
टॉप बातम्या

“हा माझ्या जीवनातील सर्वात मोठा क्षण”, ब्रिस्बेन कसोटीतील विजयानंतर रिषभ पंतने व्यक्त केल्या भावना

January 20, 2021
Photo Courtesy: Twitter/@ICC
टॉप बातम्या

“त्याच्याकडे असाधारण प्रतिभा आहे”, ऑस्ट्रेलियन फलंदाजाने केले रिषभ पंतचे कौतुक

January 20, 2021
Photo Courtesy: Twitter/@lionsdenkxip
टॉप बातम्या

आयपीएल २०२१ : पंजाबने ग्लेन मॅक्सवेलला दिला नारळ, तर ‘या’ खेळाडूंना ठेवले संघात कायम

January 20, 2021
Photo Courtesy: Twitter/@ICC and @BCCI
टॉप बातम्या

“मी अजूनही धक्क्यातून सावरलो नाही”, भारतीय संघाच्या विजयानंतर रिकी पाँटिंग यांची प्रतिक्रिया

January 20, 2021
Photo Courtesy: Twitter/@ICC
टॉप बातम्या

…म्हणून भारतीय संघाच्या विजयानंतर राहुल द्रविडची होतेय चर्चा

January 20, 2021
Photo Courtesy: Twitter/@ICC
टॉप बातम्या

BAN vs WI : शाकिब अल हसनच्या दमदार पुनरागमनाच्या जोरावर बांग्लादेशचा विंडीजवर ६ गड्यांनी विजय

January 20, 2021
Next Post
Photo Courtesy: Twitter/mipaltan

सूर्यकुमार यादव 'अशी' कामगिरी करणारा मुंबई इंडियन्सचा ठरला सातवा खेळाडू

Photo Courtesy: Twitter/IPL

'असा' विक्रम करणारा मुंबई इंडियन्स ठरला पहिला संघ

Photo Courtesy: Twitter/ BCCI

कसोटी क्रिकेटमध्ये तिसऱ्या क्रमांकावर खेळणारे जगातील ३ सर्वोत्तम फलंदाज

ADVERTISEMENT
Maha Sports

© 2020.

Navigate Site

  • About Us

Follow Us

No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू

© 2020.