---Advertisement---

रोहितचा अप्रतिम झेल आणि प्रशिक्षकांची शिट्टी, पाहा खास व्हिडिओ

---Advertisement---

अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर भारत आणि इंग्लंड यांच्यादरम्यान टी२० मालिकेतील तिसरा सामना खेळला गेला. या सामन्यात इंग्लंडने भारतीय संघाला ८ गड्यांनी पराभूत करत मालिकेत २-१ अशी आघाडी घेतली. मात्र, या सामन्यात इंग्लंडचा सलामीवीर जेसन रॉयला बाद करताना भारताचा उपकर्णधार रोहित शर्माने एक अप्रतिम झेल टिपला.

रोहितने टिपला अप्रतिम झेल
भारतीय संघाने दिलेल्या १५७ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना इंग्लंडसाठी जोस बटलर व जेसन रॉय सलामीवीर म्हणून मैदानात उतरले. दोघांनी संघाला समाधानकारक सुरुवात दिली. इंग्लंडच्या डावातील चौथे षटक टाकण्यासाठी भारतीय कर्णधार विराट कोहलीने प्रमुख लेगस्पिनर युजवेंद्र चहलला पाचारण केले.

षटकातील तिसऱ्या चेंडूवर जेसन रॉयने रिव्हर्स स्विपचा फटका खेळला. मात्र, पॉईंटवर उभ्या असलेल्या उपकर्णधार रोहित शर्माने चपळाई दाखवत, पुढे सूर मारून तो झेल टिपला.

https://twitter.com/shriyaxx45/status/1371866634852257794

प्रशिक्षकाने दिली दाद

रोहित शर्माने टिपलेल्या झेलाचे संघ सहकाऱ्यांनी कौतुक केले. मात्र, त्यानंतर दाखवलेल्या रिप्लेमध्ये भारतीय संघाचे गोलंदाजी प्रशिक्षक भारत अरुण हे देखील अनोख्या पद्धतीने त्याचे कौतुक करताना दिसून आले. अरुण यांनी रोहितच्या त्या झेलाला चक्क शिट्टी वाजवून दाद दिली.

इंग्लंडचा दमदार विजय
मालिका १-१ अशा बरोबरीत असताना तिसऱ्या सामन्यात भारतीय संघाला सहजरीत्या पराभूत केले. भारताने दिलेल्या १५७ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना सलामीवीर जोस बटलरने नाबाद ८३ धावांची खेळी करत इंग्लंडला विजय मिळवून दिला. जॉनी बेअरस्टोने नाबाद ४० धावा बनविल्या. उभय संघामधील चौथा सामना १८ मार्च रोजी खेळविला जाईल.

महत्त्वाच्या बातम्या –

बटलरने चुकवला थ्रो आणि कोहलीने चोरली धाव, पाहा व्हिडिओ

अरेरे! सलग दुसऱ्या सामन्यात शून्यावर बाद होताच राहुलवर ओढवली ‘ही’ नामुष्की

‘कर्णधार’ कोहली अव्वल स्थानी! अर्धशतकासह केन विलियम्सनच्या ‘या’ विश्वविक्रमाची बरोबरी

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---