भारताच्या एकदिवसीय आणि टी-२० संघाचा कर्णधार रोहित शर्मा (rohit sharma) याने मंगळवारी (१४ डिसेंबर) अलीबागमध्ये जमीन खरेदी केली आहे. रोहिने अलीबागमध्ये चार एकर जमीन त्याची पत्नी रितिका सजदेहच्या नावावर खरेदी केली. त्याने रितिका आणि इतर २ व्यक्तींसह या ठिकाणी भेट दिली आणि उपनिबंधक कार्यालयात कागदोपत्री व्यवहार पूर्ण केले. रोहित अलिबागमध्ये जमीन खरेदी करणारा पहिला खेळाडू नसून त्याच्या आधी याठिकाणी सचिन तेंडुलकर (sachin tendulkar), विराट कोहली (virat kohli), रवी शास्त्री (ravi shastri) आणि अजीत आगरकर यांच्या देखील येथे प्रॉपर्टी आहेत.
इंडियन एक्सप्रेसने दिलेल्या माहितीनुसार, रोहितने म्हात्रोली गावात ही जमीन खरेदी केली आहे, हे गाव अलीबागपासून २० किलोमिटरच्या अंतरावर आहे. वृत्तानुसार, रोहितने घेतलेल्या या जमीनीची किंमत ९ कोटी रुपये आहे. अलिबागच्या उपनिबंधक संजना जाधव म्हणाल्या, “हे खरं आहे की, रोहित शर्मा मंगळवारी आमच्या कार्यालयात जमिनीच्या सौद्यासाठी आला होता. परंतु आम्ही या गोष्टीची पुष्टी करू शकत नाही की, ही जमीन त्याने खरेदी केली आहे की त्याच्या सोबत आलेल्या व्यक्तिने.”
रोहितने ज्या गावात ही जमीन खरेदी केली आहे, त्या गावच्या सरपंचांनी देखील याची माहिती दिली. सरपंच म्हणाले की, “जमीन त्याच्या पत्नीच्या नावावर खरेदी केली गेली होती. त्यांनी उपनिबंधक कार्यालयात नोंदणीची औपचारीकता पूर्ण केली आणि नंतर एक छोटी पूजा करण्यासाठी गावात दाखल झाला.”
भारतीय संघ गुरुवारी (१६ डिसेंबर) दक्षिण अफ्रिका दौऱ्यासाठी रवाना झाला आहे. रोहित शर्मा मात्र दौऱ्यातील कसोटी मालिकेत सहभागी होणार नाही. सरावादरम्यान रोहितच्या डाव्या पायाला दुखापत झाल्याचे समोर आले होते आणि त्यानंतर त्याने कसोटी मालिकेतून माघार घेतली. कसोटी मालिकेतनंतर जानेवारी खेळल्या जाणाऱ्या एकदिवसीय मालिकेत मात्र तो सहभाही होईल अशी आशा आहे.
विराट कोहलीने टी-२० विश्वचषकानंतर भारताच्या टी-२० संघाचे कर्णधारपद सोडले होते आणि नंतर ही जबाबदारी रोहितवर सोपवली गेली होती. अशात बीसीसीयने आगामी दक्षिण अफ्रिका दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर रोहितला एकदिवसीय कर्णधारपद देखील सोपवले आणि विराटला या पदावरून हटवण्यात आले. दक्षिण अफ्रिकेतील एकदिवसीय मालिका ही रोहितसाठी नियमित एकदिवसीय कर्णधाराच्या रुपातील पहिलीच मालिका असेल.
महत्वाच्या बातम्या –
ब्रॉडने १५० वा कसोटी खेळताच इंग्लंडची ऑस्ट्रेलियाशी बरोबरी, टीम इंडियाचाही विक्रमाच्या यादीत समावेश
रोहित कसोटी मालिकेतून ‘आऊट’ झाल्यानंतर मयंकसोबत सलामीसाठी ‘हे’ तिघे दावेदार, १ नाव अनपेक्षित
Video: अशी दिसते विरुष्काची लाडकी लेक, बाबा विराटने विनंती केल्यानंतरही वामिकाचा चेहरा कॅमेरात कैद






