नुकतीच दक्षिण आफ्रिका व भारत (south africa vs India ) या दोन्ही संघांमध्ये ३ कसोटी सामन्यांची मालिका पार पडली होती. या मालिकेत भारतीय संघाला २-१ ने पराभवाचा सामना करावा लागला. तर ३ वनडे सामन्यांच्या मालिकेत भारतीय संघाला ३-० ने पराभवाचा सामना करावा लागला होता. ही निराशाजनक कामगिरी विसरून भारतीय संघ वेस्ट इंडिज संघाविरुद्ध (India vs West Indies) होणाऱ्या मालिकेत चांगली कामगिरी करण्याच्या प्रयत्नात असणार आहे. या मालिकेसाठी बीसीसीआयने १८ सदस्यीय खेळाडूंचा संघ जाहीर केला आहे. तसेच रोहित शर्मा (Rohit sharma) पहिल्यांदाच पूर्णवेळ कर्णधार म्हणून मैदानात उतरणार आहे. दरम्यान कर्णधार म्हणून त्याला एक मोठा पराक्रम करण्याची सुवर्णसंधी असणार आहे.
वेस्ट इंडिज विरुध्द होणाऱ्या वनडे मालिकेत रोहित शर्माला माजी भारतीय कर्णधार मोहम्मद अजहरुद्दिन (Mohammad azharuddin) यांना मागे टाकण्याची सुवर्णसंधी आहे. मोहम्मद अजहरुद्दिन यांनी आपल्या कारकिर्दीतील ३३४ सामन्यातील ३०८ डावात ३६.९२ च्या सरासरीने ९३७८ धावा केल्या आहेत. यादरम्यान त्यांनी ७ शतक आणि ५८ अर्धशतके झळकावली होती.
तर रोहित शर्माच्या नावे आतापर्यंत ९२०५ धावांची नोंद आहे. आगामी वनडे मालिकेत जर त्याला १७४ धावा करण्यात यश आले. तर तो माजी भारतीय कर्णधार मोहम्मद अजहरुद्दिन यांना मागे सोडणार आहे.
इतकेच नव्हे तर तो वनडे क्रिकेटमध्ये भारतीय संघासाठी सर्वाधिक धावा करणारा ६ वा भारतीय फलंदाज ठरेल. भारतीय संघासाठी वनडे क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम सचिन तेंडुलकरच्या नावे आहे. सचिन तेंडुलकरने (Sachin Tendulkar) आपल्या वनडे कारकिर्दीत एकूण १८४२६ धावा केल्या होत्या. तर दुसऱ्या स्थानी विराट कोहली (Virat Kohli) आहे. विराटने आतापर्यंत १२२८५ धावा केल्या आहेत. तसेच या यादीत तिसऱ्या स्थानी माजी भारतीय कर्णधार सौरव गांगुली (Sourav Ganguly) आहे. सौरव गांगुलीने ११२२१ धावा केल्या होत्या. तसेच भारतीय वरिष्ठ संघाच्या मुख्य प्रशिक्षकाची जबाबदारी पार पाडत असलेल्या राहुल द्रविडने (Rahul Dravid) १०७६८ धावा केल्या होत्या.
महत्वाच्या बातम्या :
बापरे, शास्त्री गुरुजी भडकले! म्हणतायेत, “तुम्ही तर भारतीय क्रिकेटचा कणा नाहीसा करताय”
हे नक्की पाहा :