---Advertisement---

…तर हिटमॅन रोहित शर्मा मोडणार सुरेश रैनाचा हा विक्रम

On: बुधवार, नोव्हेंबर 6, 2019 7:21 PM
---Advertisement---

राजकोट। उद्या(7 नोव्हेंबर) भारत विरुद्ध बांगलादेश(India vs Bangladesh) संघात दुसरा टी20 सामना(2nd T20I) सौराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियम, राजकोट(Saurashtra Cricket Association Stadium, Rajkot) येथे पार पडणार आहे. या सामन्यात भारताचा सलामीवीर फलंदाज रोहित शर्माला एक खास विक्रम करण्याची संधी आहे.

या सामन्यात जर रोहितने 72 किंवा त्यापेक्षा अधिक धावा केल्या तर तो ट्वेंटी-20 क्रिकेट प्रकारात सर्वाधिक धावा करणाऱ्या भारतीय क्रिकेटपटूंमध्ये सुरेश रैनाला(Suresh Raina) मागे टाकेल.

सध्या रोहितच्या ट्वेंटी20 क्रिकेटमध्ये 319 सामन्यात 32 च्या सरासरीने 8321 धावा आहेत. या धावांसह तो ट्वेंटी-20 क्रिकेट प्रकारात सर्वाधिक धावा करणाऱ्या भारतीय क्रिकेटपटूंमध्ये विराट कोहली(Virat Kohli) आणि रैनाच्या पाठोपाठ तिसऱ्या क्रमांकावर आहे.

रैना 319 सामन्यात 8392 धावांवर या यादीत दुसऱ्या क्रमांकावर आहे. तर अव्वल क्रमांकावर विराट असून त्याच्या ट्वेंटी20 मध्ये 271 सामन्यात 40.74 च्या सरासरीने 8556 धावा आहेत.

ट्वेंटी20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम विंडीजचा आक्रमक फलंदाज ख्रिस गेलच्या नावावर आहे. त्याने ट्वेंटी20 मध्ये 394 सामन्यात 38.61 च्या सरासरीने 13051 धावा केल्या आहेत.

ट्वेंटी20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या जगातील एकूण क्रिकेटपटूंमध्ये विराट 6 व्या, रैना 7व्या आणि रोहित 9व्या क्रमांकावर आहे.

#ट्वेंटी20 मध्ये (सर्व प्रकारच्या 20 षटकांच्या सामन्यात )सर्वाधिक धावा करणारे फलंदाज

13051 धावा – ख्रिस गेल (394 सामने)

9922 धावा – ब्रेंडन मॅक्यूलम (370 सामने)

9780 धावा – किरॉन पोलार्ड (490 सामने)

9120 धावा – शोएब मलिक (360 सामने)

9042 धावा – डेव्हिड वॉर्नर (276 सामने)

8556 धावा – विराट कोहली (271 सामने)

8392 धावा – सुरेश रैना (319 सामने)

8388 धावा – ऍरॉन फिंच (271 सामने)

8321 धावा – रोहित शर्मा (319 सामने)

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---