ऑस्ट्रेलियात सुरू असलेल्या टी20 विश्वचषकात बुधवारी (2 नोव्हेंबर) भारत आणि बांगलादेश यांच्या दरम्यान सामना खेळला गेला. या सामन्यात बांगलादेशने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. भारतासाठी या सामन्याची सुरुवात खराब झाली व कर्णधार रोहित शर्मा स्वस्तात बाद झाला. मात्र, अव्वल नऊ संघांविरुद्ध मागील तीन विश्वचषकात त्याची कामगिरी काहीशी अशीच राहिली आहे. (Rohit Sharma Flop Against Top 9 Teams in T20 World Cup)
बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात रोहित 8 चेंडूंचा सामना करताना केवळ 2 धावा करू शकला. या संपूर्ण विश्वचषकाचा विचार केल्यास तो केवळ एक अर्धशतक पूर्ण करू शकला आहे. पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यात चार तर दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 15 धावा करण्यात त्याला यश आलेले. केवळ पात्रता फेरीतून पुढे आलेल्या नेदरलँड्सविरूद्व तो अर्धशतक साजरे करू शकला होता.
टी20 विश्वचषक इतिहासातील चौथा सर्वाधिक धावा काढणारा फलंदाज असलेला रोहित, मागील तीन विश्वचषकांपासून अव्वल नऊ संघांविरुद्ध अर्धशतक पूर्ण करू शकला नाही. 2014 विश्वचषकात बांगलादेश विरुद्ध त्याच्या बॅटमधून बलाढ्य संघाविरुद्ध अर्धशतक आलेले. 2016 टी20 विश्वचषकापासून त्याने केवळ तीन वेळा 50 धावांची वेस ओलांडली आहे. 2016 विश्वचषकात त्याला एकही अर्धशतक झळकावता आले नव्हते. 2021 मध्ये नामीबियाविरुद्ध 37 चेंडूत 56 आणि अफगाणिस्तानविरूद्ध 47 चेंडूवर 74 धावा केल्या होत्या.
भारतीय संघाचे नेतृत्व करत असलेल्या रोहितची मागील 20 टी20 सामन्यातील कामगिरी देखील तितकीशी प्रभावी नाही. यादरम्यान तो केवळ दोन अर्धशतके पूर्ण करू शकला आहे. आशिया चषक तसेच ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिके विरुद्धच्या महत्त्वाच्या मालिकांमध्ये तो संघाला मदत करू शकला नव्हता.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
एका चेंडूने बनवले व्हिलन एकाने हिरो! जीवदान मिळाल्यावर दोन चेंडूच टिकू शकला रोहित
बांगलादेश बनला टॉसचा बॉस! टीम इंडियाला फलंदाजीचे आमंत्रण; संघात महत्त्वपूर्ण बदल