गाबा कसोटीच्या दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला आहे. पहिल्या दिवसाचा खेळ पावसामुळे वाहून गेल्यानंतर दुसऱ्या दिवशी कांगारु फलंदाजांनी जोरदार फलंदाजी केली. ऑस्ट्रेलियासाठी ट्रॅव्हिस हेड आणि स्टीव्ह स्मिथ यांनी शतकं ठोकली. स्मिथनं तब्बल 18 महिन्यांनंतर कसोटीत 100 धावांचा आकडा गाठला. तो 101 करून जसप्रीत बुमराच्या गोलंदाजीत बाद झाला. कर्णधार रोहित शर्मानं स्लिपमध्ये त्याची कॅच घेतली. जबरदस्त लयीत दिसत असलेल्या स्मिथचा रोहित शर्मानं शानदार झेल घेतला, ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. चाहते रोहितच्या या झेलचं कौतुक करत आहेत.
वास्तविक, डावातील 83वं षटक टाकण्यासाठी आलेल्या बुमराहनं शेवटचा चेंडू स्मिथच्या स्टंपला लक्ष्य करत टाकला. याला अडवण्याच्या प्रयत्नात स्मिथचं नियंत्रण सुटलं. त्याचा परिणाम असा झाला की चेंडू त्याच्या बॅटची कड चाटून मागे गेला. इथे पहिल्या स्लीपमध्ये उभ्या असलेल्या रोहित शर्मानं डाव्या बाजूला एक लांब उडी मारून झेल पकडला. त्याची ही चपळता पाहून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. तुम्ही रोहितच्या या झेलचा व्हिडिओ येथे पाहू शकता.
Just moments after making his hundred, Steve Smith was dismissed by Jasprit Bumrah. #AUSvIND pic.twitter.com/i0sky2vYl5
— cricket.com.au (@cricketcomau) December 15, 2024
आऊट होण्यापूर्वी स्टीव्ह स्मिथनं कसोटी कारकिर्दीतील 33वं शतक झळकावलं. संघासाठी चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करताना त्यानं एकूण 190 चेंडूंचा सामना केला. तो 53.16 च्या स्ट्राइक रेटनं 101 धावा करण्यात यशस्वी झाला. या काळात त्याच्या बॅटमधून 12 सुंदर चौकार आले.
गाबा येथे शतक झळकावून स्टीव्ह स्मिथ ऑस्ट्रेलियासाठी कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतके झळकावणारा दुसरा फलंदाज ठरला आहे. या बाबतीत त्यानं दिग्गज स्टीव्ह वॉला मागे टाकलं. वॉ यानं ऑस्ट्रेलियाकडून कसोटी क्रिकेटमध्ये 32 शतकं झळकावली होती. आता स्मिथच्या नावावर 33 शतकं झाली आहेत. या लिस्टमध्ये माजी कर्णधार रिकी पॉन्टिंग पहिल्या स्थानावर असून त्यानं 41 शतकं झळकावली आहेत.
हेही वाचा –
ट्रॅव्हिस हेड पुन्हा डोकेदुखी, स्मिथनं संपवला शतकाचा दुष्काळ; असा राहिला गाबा कसोटीचा दुसरा दिवस
शतकासह ट्रॅव्हिस हेडचा गाबामध्ये मोठा विक्रम, अशी कामगिरी करणारा इतिहासातील पहिलाच खेळाडू!
‘वन मॅन आर्मी’..! बुम-बुमचा पुन्हा एकदा पंजा, गाबा कसोटीत जसप्रीत बुमराहची ऐतिहासिक कामगिरी